गुन्हेगारी

इंदिरानगर पोलिसांची धडक कारवाई मोटरसायकल चोर ताब्यात

सात लाखाचा मुद्देमाल जप्त.

 

नाशिक जनमत  नाशिक सर्व परिसरामध्ये मोटरसायकल चोरीला जात असल्याचे प्रकार घडत आहेत दरम्यान शहरात मोटरसायकल चोर सापडत नसल्याने पोलिसांना वरचा विश्वास नागरिकांचा उडत होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलिसांनी दहा मोटरसायकल एका युवकास ताब्यात घेतले आहे.शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी धडक कारवाई करीत वाहनचोरी प्रकरणातील आरोपीला अटक केली. तसेच सुमारे सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आणि चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष शोधमोहिमेदरम्यान इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हेशोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वडाळागाव परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी

कौशल्यपूर्ण तपास आणि सखोल चौकशी करीत आरोपीकडून नाशिक शहर, ग्रामीण तसेच इतर ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले.

या कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांमध्ये तीन वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकींचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत सुमारे सात लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची वर्तवण्यात आली असून, वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे-शक्यता

या तपासात आणखी काही चोरीची वाहने हस्तगत होण्याचीही शक्यताही पोलिस पथकाकडून वर्तविण्यात येत आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने केलेल्या या कारवाईमुळे दुचाकी चोरांवर धाक निर्माण होण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी सोसायटी पार्किंग मध्ये सीसीटीव्ही बसून घ्यावे. वॉचमन ची  व्यवस्था करावी. असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे