आरोग्य व शिक्षण

मा.महापौर श्रीमती हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते नेत्रदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ .

नाशिक जनमत   नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आज दि. १६ एप्रिल २०२६ रोजी नाशिक महानगरपालिका मुख्यालय येथे मामहापौर श्री. मती हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते नेत्रदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत कॉर्नियल अंधत्वामुळे सुमारे १०,००० रुग्णांना दृष्टीअभावी जीवन जगावे लागत आहे. नेत्रदानाद्वारे या रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळू शकते. तथापि, सध्या नाशिक शहरात दरवर्षी फक्त सुमारे १०० नागरिक नेत्रदान करतात, तर सुमारे २०० नवीन रुग्ण दरवर्षी अंधत्वाच्या यादीत समाविष्ट होत आहेत. ही दरी कमी करण्यासाठी नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका व असोसिएशन ऑफ फिजिशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसेच खाजगी/मनपा रुग्णालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नेत्रदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. तसेच नेत्रदानाबाबतची सर्व माहिती, नेत्रपेढ्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक यांचा समावेश असलेले माहितीपर पोस्टर्स विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास मा. उपमहापौर श्री विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मा. श्री मच्छिंद्र सानप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. जितेन्द्र धनेश्वर ,डॉ.प्रशांत शेटे,डॉ.शिल्पा काळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय नेत्ररोग तज्ञ डॉ. अतुल सोनवणे, असोसिएशन ऑफ फिजिशियन्सचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रे व सचिव डॉ. प्रीतम अहिरे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी मा. महापौर व इतर मान्यवरांनी नागरिकांना नेत्रदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे