गुन्हेगारी
112 हेल्पलाइन आपात्कालीन फोन नंबर चे मुंबईमध्ये लोकार्पण . संकट समयी 112 डायल केल्यावर मिळणार पोलिसांतर्फे तात्काळ मदत
नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे नागरिकांना भेटणार आपात्कालीन प्रसंगी मदत.
- नाशिक जनमत. राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती मद्ये पोलीस सेवा एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करून देण्याच्या अनुअंशागाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रना डायल 112 प्रकल्पाचा लोकार्पण सोहाला दिनांक 2 4 2022 रोजी दुपारी बारा वाजून तीस मिटाने महाराष्ट्र सायबर कार्यालय मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाला नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांनी स्वतः लोकार्पण सोहळा शुभप्रसंगी डायल 112 प्रकल्प नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे
उपस्थित राहून नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा डायल 112 प्रकल्प राबवण्यात करता 57 दुचाकी वाहने व 46चार चाकी वाहने उपलब्ध करून देऊन जिल्ह्यांमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला अथव कोणास आपत्कालीन काळात मदत लागल्यास टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क साधल्यास पोलिस यंत्रणेकडून तात्काळ आवश्यक मदत उपलब्ध होईल .डायल 112 ची प्रणाली पोलीस कंट्रोल रूमला जोडण्यात आली आहे हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर तात्काळ दखल घेतली जाणार असून या प्रणालीमुळे नागरिकांच्या तक्रारी घेता येईल आणि लोकाभिमुख काम करण्यास पोलिसांना मदत होईल नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत लागल्यास डायल 112 चा वापर करावा असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे