ब्रेकिंग

नाशिक सिन्नर रोडवर मोहनदारी घाटात तीन वाहनाचा विचित्र अपघात. पाच जण जागीच ठार झाल्याची भीती. चार जण गंभीर जखमी.

  • नाशिक जनमत काल पळसे गावाजवळ एसटीचा भीषण अपघात झाला होता यामध्ये दोन जणांना आपला जीव गमावा लागला. दरम्यान आज दुपारी साडेचार वाजता पुन्हा याच रस्त्यावर मोहन दरी घाटामध्ये तीन वाल्यांचा विचित्र अपघात झाला. एका स्विफ्ट कारचे टायर फुटल्याचे सांगण्यात येत असून ही कार दुसऱ्या कारवर आढळली तसेच अजूनही एक चार चाकी वाहन अपघात ग्रस्त झाले. वाहना मध्ये बसलेले तीन शालेय विद्यार्थी नी  व दोन विद्यार्थी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक सिन्नर परिसर अपघातामुळे हदराला आहे. यावेळी घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे अपघातग्रस्त वाहनांचा जागेवर चक्काचूर झाला आहे या रस्त्यावर. दिवसेंदिवस होणारे अपघात हे वांहंधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही अपघातामुळे वाहन चालकांमध्ये व या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. ट्राफिक पोलिसांनी लक्ष घालून या ठिकाणी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा. यासाठी मार्गदर्शन करणे जरुरी झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निळा रंगाच्य कार मध्ये हर्षल बोडके व त्याचे मित्र पुण्याकडून नाशिककडे येत होते. त्यांची कार डिव्हायडरवर धडकली या न्टर पांढऱ्या रंगाची नंबर एस एफ 45 42 ही पुण्याकडून नाशिककडे येत होती त्यावर ही कार धडकली तसेच इंडिका कार एम एच 18 इ एन 43 43 या कार वरही कार  धडकल्या. या अपघातामध्ये पाच जण ठार तर चार जण जखमी झाल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे