ब्रेकिंग
नाशिक जिल्ह्यात राज्यात थंडीचा कडाका वाढला. ओझरला तापमान 6.4.
“नासिक जनमत चंद्रकांत धात्रक जिल्ह्यासह राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड सायखेडा तसेच गोदा काट परिसर थंडीने हूड हूड ला आहे. गुरुवारी सायंकाळपासून थंडी परतल्याने निफाड तालुक्यातील पारा पारा 7.2 अशा पर्यंत खाली आल्याने द्राक्ष उत्पादकासह पक्ष पालकांची चिंता वाढली आहे. सध्या चेन्नई आंध्र प्रदेश इत्यादी भागांमध्ये जोरदार पाऊस चालू असून वादळाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या चार दिवसांमध्ये नाशिक सह राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थी शाळेत जात असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे घालून कपडे घालून दिसून आले. अनेक ठिकाणी नाशिक शहरात देखील शेकोट्या पेटल्या होत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी व आरोग्यासाठी आयुर्वेद मेथीचे लाडू बनवण्याचे काम अनेक घरात चालू आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी गरम कपडे परिधान करावे गरज असेल तरच घराबाहेर पडावे. असे आरोग्य विभाग तर्फेसांगण्यात आले आहे. थंडीमुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते मनीला तडे जाऊ शकतात. अनेक द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या देखील पेटवल्या जात असल्याचे चित्र आहे थंडीमुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.