आरोग्य व शिक्षण

सिडको महाले फार्म चे रस्ते गेले खड्ड्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते

महाले फार्म चे रस्ते गेले खड्ड्यात

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते

नवीन नाशिक प्रतिनिधी : महाले फार्म महाराणा प्रताप चौक ते उदय कॉलनी पवन नगर रस्ता महापालिकेने ८ महिन्यांपासून ड्रेनेज व जलवाहिनीच्या कामासाठी सदरहू रस्ता खोदून ठेवल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सागर चौधरी यांच्या पाठपुराव्यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर काम पूर्ण झाले व हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला.
परंतु १-२ महिने रस्ता सुरु होऊन झाले आणि आता ह्या रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र आहे. “रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते” याचा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना यामुळे मोठ्याप्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूर्वीचा प्रभाग क्रमांक २९ व सध्याचा प्रभाग क्रमांक ३७ मधील महाले फार्म महाराणा प्रताप चौक ते उदय कॉलनी पवन नगर हा रस्ता उपेंद्र नगर, त्रिमूर्ती चौक, सातपुर औद्योगिक वसाहत, त्रंबक रोड आदी परिसराला जोडला जाणारा नजीकचा रस्ता असल्याने याठिकाणी वाहतुकीची वर्दळ सतत सुरु असते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यात मोठमोठाले खड्डे असल्याने परिसरातील नागरिकांना इतरत्र जाण्यासाठी खुप ञास सहन करावा लागत आहे. या रस्त्यातील खड्यांमुळे नोकरदार वर्ग तसेच विध्यार्थ्यांना देखील कसरत करत याठिकाणाहून मार्गक्रमण करावे लागत आहे.
खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांना आमंत्रण देण्याचे काम महानगरपालिका करते आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
महानगरपालिकेने महाले फार्म परिसरातील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने नवीन नाशिक उपविभाग प्रमुख सागर चौधरी व स्थानिक रहिवाशांकडून मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया
महाले फार्म येथुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यात खड्डे असल्याने खुप ञास सहन करावा लागत आहे तरी महानगरपालिकेकडून लवकरात लवकर हा रस्ता नवीन करावा किंवा रस्त्याची किमान डागडुजी तरी करावी अशी आमची मागणी आहे.
सागर चौधरी
उपविभाग प्रमुख – शिवसेना
नवीन नाशिक

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे