पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण प्रेमींचा मुख्य वन अधिकाऱ्यांशी संवाद.

पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण प्रेमींचा मुख्य वन अधिकाऱ्यांशी संवाद
नाशिकच्या विविध पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन मुख्य वनसंवर्धक श्री ऋषिकेश रंजन यांची भेट घेतली . नासिक मधील पर्यावरण विषयी विविध विषयांवर सुसंवाद साधला. ब्रह्मगिरी येथील अवैध खणन, अंजनेरी येथे होणारा रोपवे ,अवैध होणारी वृक्षतोड व नवीन ठिकाणी देशी झाडांची लागवड अशा विविध विषयांवर पर्यावरण प्रेमींनी आपले विचार मांडले .
या मध्ये गिव्ह फाउंडेशन श्री रमेश अय्यर , तुषार गायकवाड, गरुड झेप प्रतिष्ठानचे डॉक्टर संदीप भानोसे , मानव उत्थान मंच चे जगविर सिंग , भारती जाधव ,मनीष बाविस्कर ,राह फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सर्वांनी केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या वनसंरक्षण दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविला व जनजागरण करण्याकरता स्वाक्षरी मोहीम राबविली .
केंद्र सरकारतर्फे वनसंरक्षण दुरुस्ती विधेयक मानण्यात येणार आहे .यात नैसर्गिक जैवविविधता ,जंगलातील व्यापारी करण्यासाठी औद्योगीकरण यावर भर असल्याचा दावा सर्व पर्यावरण प्रेमींनी केला आहे . आणि म्हणून त्याला विरोध करत आहे.