अनिष्ट प्रथा रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी सरसावल्या महिला.
अनिष्ट प्रथा रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी सरसावल्या महिला
वीरनारी वीरमाता बहूउद्देशीय सेवा भावी संस्थेच्याच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
इगतपुरी ( प्रतिनिधी )
समाजातील विकृतीला महिलाच आळा घालूशकतात,प्रत्येक स्त्री शक्तीचे रूप आहे, स्री मध्ये खरी ताकद लपली आहे, त्याचा वापर केला पाहिजे, महिलांनी स्वतः ला सिद्ध केले पाहिजे, समाजात स्वतःची ओळख निर्माण करा असे प्रतिपादन मनीषा मराठे यांनी केले.
कालिका मंदिर मुंबई नाका नाशिक येथे वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभ प्रसंगी राज्यभरातून सैन्यात देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद सैनिकांच्या 100 विरपत्नी व 50 माजी सैनिक पत्नी यांनी हजेरी लावली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.प्रथम दीप प्रज्वलन करून व भारत माता, कालिका माता, प्रतिमा पूजन करून शहीदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, त्यानंतर प्रमुख अतिथी सत्कार करण्यात आले, व मान्यवरांनी आलेल्या वीर नारींना मार्गदर्शन केले, त्यानंतर विरपत्नींचे हळदी कुंकू करून करून त्यांना सौभाग्याचं लेण देण्यात आलेसमाजातून विधवा प्रथा सारख्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी व त्या बंद होण्यासाठी वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एक धाडसी निर्णय घेण्यात आला, शासनाने अनेक योजना राबवूनही विधवा प्रथा सारख्या अनेक प्रथा समाजातून हद्दपार होत नाही, त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, आणी त्यासाठी रणरागिणी बनून शहीद सैनिकांच्या पत्नी, व माता ह्या सरसावल्या आहेत. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा रेखा ताई खैरनार, उपाध्यक्ष कल्पना रौंदळ यांनी केले तर मुंबई येथील उमा कुलकर्णी, व मनीषा मराठे यांनी वीरनारींना सौभाग्याचं लेण दिले, प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना ताई जाधव, शिल्पी अवस्थी, सीमा ताई दिवटे, उमा कुलकर्णी, मनीषा मराठे, मथुरा ताई जाधव, स्नेहा कोकणे पाटील, सुवर्णा खाडे आदी उपस्थीत होत्या. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक यांनीं कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी मदत केल्यामुळे सर्व वीरनारिनी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले व यापुढेही सैनिक संघटनांनी शहीद परिवाराच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्यातून आलेल्या वीर नारी कविता ताई साळवे आणि अहमदनगर च्या अंबिका ताई बोंडे यांनी केले.
प्रास्ताविक रेखा ताई खैरनार यांनी केले तर सूत्र संचालन प्रिती बोडके व यशोदा गोसावी यांनी केले आभार सुवर्णा शिंदे यांनी मानले