ब्रेकिंग
सावता नगर येथे पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकी वरून आलेल्या चोराने खेचले

नाशिक जनमत. सिडकोतील सावता नगर येथील क्रॉम्प्टन हॉल समोर एक महिला पायी जात असताना तिचे मंगळसूत्र खेचण्यात आले. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरांमध्ये सोनसाखळी खेचण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी सणासुदीच्या दिवसांमध्ये चोर घरफोडी करू लागले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगला जोशी यांच्या तक्रारीनुसार सायंकाळी सहा वाजता रस्त्याने पायी
जात असताना समोरून आलेल्या दु चाकी वरील व्यक्तीने 84 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गळ्यातून खेचले व तो पळून गेला. या घटनेमुळे महिला घाबरली होती. अंबड पोलीस तपास करत आहे.