ब्रेकिंग
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार*
*लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार*
- नाशिक जनमत. अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहे . अंबड लीक रोड वरील पीडितेने अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी यतीश गुप्ताने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले.
तू 18 वर्षांची झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने भेटण्यास नकार दिला असता मारहाण झाली. तसेच यतीशने मोबाइलमध्ये काढलेले फोटो व व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली. सन २०२१ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान अंबड लिंक रोड परिसरात हा प्रकार चालला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.