ब्रेकिंग

भारतीय जनता पक्षावर दिनकर पाटील नाराज. निर्धार मेळाव्यात निवडणूक लढणार असल्याचे जाहीर. मेळाव्यास हजारो नागरिकांची उपस्थिती.

नाशिक जनमत विधानसभा पश्चिम मतदारसंघातून इच्छुक असलेले भारतीय जनता पक्षाचे दिनकर अण्णा पाटील यांना तिकीट न मिळाल्याने आज सातपूर येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

नाराज असलेले दिनकर पाटील यांनी सांगितले की गेल्या 40 वर्षापासून मी प्रभागांमध्ये व जिल्ह्यात काम करत आहे. मला. मागील विधानसभा मध्ये देखील भारतीय जनता पक्षाने सांगितले होते की अण्णा तुम्हाला महापौर करणार. परंतु दिलेले आश्वासन पाळले नाही. लोकसभेत देखील मला शांत बसवण्यात आले. मुख्यमंत्री यांनी घरी येऊन सांगितले की अण्णा तुम्हाला विधानसभेचे तिकीट नक्की देणार. परंतु विधानसभेत देखील तिकीट न दिल्याने मी आणि मतदारांच्या जोरावर तसेच केलेल्या विकासाच्या कामावर मतदार मला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नक्कीच निवडून देतील. आज निर्धार मेळाव्याला एक रुपया न देता जवळपास एका दिवसात 5000 मतदारांनी उपस्थिती दाखवली. लवकरच फॉर्म भरण्याची तारीख मी सोशल मीडिया व मीडिया मार्फत जाहीर करणारा असून मोठ्या प्रमाणात मतदारांनी फॉर्म भरण्यास यावे असे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षापासून असलेल्या आमदारांनी फक्त सभा मंडप आणि ग्रीन जिम व उद्यानात खेळणी बसवली व खेळ केला असेही त्यांनी या वेळेस सांगितले. मला तुमच्यासाठी आमदार व्हायचे आहे. बंद पडलेल्या कंपन्या चालू करायचे आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी नवीन कंपन्या आणणार असे ते म्हणाले. मी फक्त नगरसेवक असताना प्रभागां मध्ये चांगले रस्ते हॉस्पिटल तसेच ग्राउंड उद्याने इत्यादी भागाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला आहे. मी जातपात मानत नाही. माझ्याबरोबर सर्वधर्म सर्व जातीपातीतील मतदार माझ्याबरोबर असून माझा विजय हा नक्की आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न मी सोडवत आहे. केव्हाही फोन केला तरी आम्ही फोन उचलतो मी माझा मुलगा तसेच पत्नी आम्ही अनेक वर्षापासून जनतेची सेवा करत आलो आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन मी लोकसभेचा प्रचार केला. परंतु खासदार हेमंत गोडसेंना तिकीट दिले. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की हेमंत गोडसे येणार नाहीत. तसेच झाले. असे ते बोलताना बोलले. घरातून पैसा टाकून मी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रभागांमध्ये शिवपुराण सप्ताह रामायण कथा भागवत कथा इत्यादी कार्यक्रम केले. मतदार देखील मोठ्या प्रमाणात माझ्याबरोबर आहे. पश्चिम मतदारसंघात सर्वे केला असता माझे नाव एक नंबरला होते तरी देखील मला तिकीट नाकारले अशी खत त्यांनी निर्धार मेळाव्यात व्यक्त केली. दरम्यान येणाऱ्या दोन-तीन दिवसात ते कोणत्या पक्षाकडून तिकीट घेतात की अपक्ष लढतात हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान भारतीय जनता पक्ष पुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे. पश्चिम मतदार संघातील सर्व भागातील सर्व धर्मातील नागरिक निर्धार मेळाव्यास उपस्थित होते. यावेळेस त्यांनी मतदारांना सांगितले की कोणी विचारले तर फक्त सांगा की दिनकर पाटीलच निवडून येणार त्यांचीच हवा आहे असा कान मंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क साधा 9273020944.9834767771.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे