नाशिक शहरांमध्येदोन दुचाकीवर आलेल्या पाच अज्ञात व्यक्तींनी पिस्टलचा धाक दाखवत कुरिअर सर्विस कंपनीच्या कामगारांकडून तब्बल २५ किलो चांदी चोरांनी लंपास केल्याप्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… अत्यंत रहदारीच्या ठिकाणी असलेल्या ठक्कर बाजार व आजूबाजूला असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर तसेच ग्रामीण पोलीस आयुक्त सचिन पाटील यांच्या बंगल्याजवळ व नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोर ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे जवळच किशोर सुधारग्रहल्य आहे.या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित सिंग धनसिंग शिखरवाल (२४, रा. फावडे लेन, मेन रोड, नाशिक, मूळ रा. नगला लालदास, रायबाग जिल्हा आग्रा, उत्तर प्रदेश हे जय बजरंग कुरियर व पार्सल सर्विसेस सराफ बाजार येथे कुरियर सर्विसचे काम करतात. रात्री साडे अकराच्या दरम्यान विविध ठिकाणचे सोने घेऊन जात असताना मोपेड वर आलेल्या व्यक्तींनी डोक्यास पिस्तूल लावून स्कूटर वरील चांदी असलेला एवज घेऊन ठक्कर बस स्थानकाकडे पळून गेले आहेत. याविषयी सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहे