सरपंच निवडीत आमदार सुहास अण्णा कांदे यांचा वर चष्मा.
*सरपंच निवडीत आमदार सुहास आण्णा कांदे यांचा वरचष्मा*
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
आज नांदगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायत सरपंच निवडणूक संपन्न झाली.
काही दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका संपन्न झाल्या होत्या. आज त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्व खाली सहापैकी सर्वाधिक 3 ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा भगवा फडकला असून, दोन ग्रामपंचायत संमिश्र तसेच एक राष्ट्रवादीच्या बाजून कौल गेला आहे.
गेल्या काळात शिवसेनेत उभी फूट पडून शिंदे गटाची निर्मिती झाली आणि आमदार सुहास अण्णा कांदे ही शिंदे गटात सामील झाले त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथा पालथ झालेली असताना देखील नांदगाव मतदार संघात मात्र आमदार सुहास आण्णा कांदे यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच पुढील प्रमाणे
फुलेनगर सरपंच उषा नामदेव पाटील (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच मीना सुनील माळी,(शिवसेना शिंदे गट)
हिंगणवाडी सरपंच मनीषा विठ्ठल डोळे (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच संभाजी गोपीनाथ बच्छाव. (शिवसेना शिंदे गट)
श्रीरामनगर सरपंच अर्चना सुभाष गायकवाड (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच शुभांगी विजय महाजन.
मल्हारवाडी सरपंच सुनंदाबाई बळीराम झेंडे (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच दीपक तात्याराव खैरनार (राष्ट्रवादी काँग्रेस),
क्रांतीनगर सरपंच पूनम पोपट जेजुरकर (रा.काँ.), उपसरपंच युवराज डोळे (शिवसेना शिंदे गट), गिरणानगर सरपंच अनिता राहुल पवार, उपसरपंच अनिल म्हसु आहेर दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बहुसंख्य ग्रामपंचायत वर भगवा फडकविल्याचा आनंद साजरा करण्यात आला.
सदर निवडणुकांमध्ये विष्णू निकम सर, राजेश कवडे, नंदू पाटील, राजाभाऊ जगताप, अरुण भोसले परसराम खंबाईत, भगवान खंबाईत, बापू पाटील, माणिक पाटील, प्रमोद भाबड,भाऊराव बागुल, युवराज डोळे, यांनी मेहनत घेतली. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नव निर्वाचित सरपंच,उप सरपंच,सदस्य तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे अभिनंदन केले.