पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली ‘शासन आपल्या दारी’* *कार्यक्रमासाठी संभाव्य जागांची पाहणी*

*पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली ‘शासन आपल्या दारी’*
*कार्यक्रमासाठी संभाव्य जागांची पाहणी*
*नाशिक, दिनांक 6 जुलै 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
जिल्ह्यात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ संभाव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज शहरातील डोंगरे वसतीगृह मैदान, संभाजी स्टेडियम व तपोवन येथील जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समेवत जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त भाग्यश्री बानाईत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
शासन आपल्या दारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमासाठी जागा अंतिम करण्याकरीता सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे पाहणी केलेल्या जागांवर पार्कींग व्यवस्था, स्टॉल्स, वैद्यकीय कक्ष व कार्यक्रमाच्या दृष्टीने अनुषंगिक सोयी-सुविधांच्या व्यवस्थेबाबत देखील पालकमंत्री श्री.भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.