ब्रेकिंग
रायगडच्या श्रीवर्धन किनाऱ्याजवळ समुद्रात संशयित बोट. तीन एके 47 रायफली आणि काडतुसे.

नाशिक जनमत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या किनाऱ्याजवळ समुद्रात गुरुवारी एक संशयित बोट आढळली त्यामध्ये तीन एके 46 रायफली आणि काडतूस होती स्थानिक नागरिकांना ही माहिती सुरक्षारक्षकांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली उडाली. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही बोट खराब हवामानामुळे वाहून आली या बोटीवर कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते ऑस्ट्रेलियामधील एका महिलेच्या नावावर ही बोट नोंदणीकृत आहे. तटरक्षक दलानुसार या बोटीची नोंदणी ब्रिटनमध्ये झाली असून ती ओमानून युरोपला रवाना झाली होती प्रवासादरम्यान बोटीतून मदत मागण्यात आली होती. दरम्यान या घटनेमुळे राज्यामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. 26 11 सारखी कुठली घटना घडू नये यासाठी सरकारतर्फे काळजी घेण्यात आली.