वारकरी व भाविकांना पथकरातून सूट
दिनांक: 8 जुलै, 2022
*वारकरी व भाविकांना पथकरातून सूट*
*:प्रदिप शिंदे*
*नाशिक, दिनांक: 8 जुलै 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आषाढीवारी मिमित्ताने पंढरपुर येथे जाणाऱ्या मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, भाविकांना या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी या कार्यालयामार्फत 7 जुलै 2022 पासून ते 15 जुलै 2022 पर्यंत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याअनुषंगाने भाविकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथून पथकर सवलत प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.