पंचवटी मधील निरामय हॉस्पिटल ठरत आहे रुग्णांसाठी संजीवनी.
*पंचवटी येथील निरामय हाॅस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी संजीवनी* *नाशिक : पंचवटी येथील सर्वसामान्यांसाठी जिवनदायिनी ठरत असलेल्या निरामय हाॅस्पिटल चे योगदान हे वंचित, गोरगरीब व दिव्यांगांसाठी तसेच विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांकरिता अतुलनीय असे आहे, कोरोना काळात या रुग्णालयाने बहुमुल्य सेवा दिल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके व त्यांचे सहकारी यांनी निरामय हाॅस्पिटल चे संचालक डाॅ. हेमंत साबळे , डाॅ. मारुती घुगे, डाॅ. प्रमोद मेतकर ,डाॅ. अनिल निकम, डाॅ. भालचंद्र ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्व हाँस्पिटल स्टाफचे योगदान असल्याने कौतुक करण्यात आले, आर्थिक कमकुवत घटकातील दिव्यांगांनी या रुग्णालयात उपचार घेतल्यास सहकार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. हेमंत साबळे यांनी सांगितले, या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, प्रहार दिव्यांग संघटना नाशिक चे जिल्हाध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, जिल्हा सचिव पंकज सुर्यवंशी, प्रहार पक्षाचे शहरअध्यक्ष शाम गोसावी ,रणजित बोधक प्रथमेश बोडके ,सत्यम बागल व रविंद्र कुटे आदी उपस्थित होते*