स्पर्श पेन्शन प्रणाली कार्यशाळेत माजी सैनिकांच्या* *समस्यांचे होणार निराकरण* *: लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे*
*स्पर्श पेन्शन प्रणाली कार्यशाळेत माजी सैनिकांच्या*
*समस्यांचे होणार निराकरण*
*: लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे*
*नाशिक, दिनांक 27 जून 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
जिल्ह्यातील माजी सैनिक व पेन्शन धारकांसाठी स्पर्श पेन्शन प्रणालीबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी 3 व 4 जुलै 2023 रोजी जिल्हा सैनिक विश्रामगृह, नाशिकरोड येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. माजी सैनिक व पेन्शन धारकांनी या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे.
रक्षा लेखा नियंत्रण कार्यालय, प्रयागराज यांच्या प्रतिनिधींमार्फत घेण्यात येणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेत समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. ज्या पेन्शन धाराकांना हयातीचे प्रमाणपत्र अथवा स्पर्श प्रणाली पेन्शन बाबतीत समस्या असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वरील वेळेत उपस्थित राहून मार्गदर्शन घ्यावे, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे यांनी कळविले आहे