ब्रेकिंग

स्पीड बोटीची प्रवासी नावेला धडक 13 जण ठार.

नाशिक जन्मत     मुंबईतील एलिफंटा लेणी पाहन्यास निघालेल्या प्रवासांच्या नीलकमल प्रवासी बोटेला नौदलाचे स्पीड बोटीने धडक दिली  13 पर्यटकांचा मृत्यू झाला. मूत्त पावलेल्या पर्यटकांमध्ये दहा पर्यटक तर तीन नदोळाच्या  जवानांचा समावेश आहे. पाच जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार चालू आहे. स्पीड बोटीच्या नव्या इंजिनची चाचणी घेत असताना बोटीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे वृत्त मिळत आहे.  दुपारी बुधवारी चार वाजता ही घटना घडली. बचाव पथकाने 101 जणांना वाचवले.

नऊ दलाचे चार हेलिकॉप्टर .14 बोटी कोस्ट गार्ड व मुंबई पोलिसांच्या तीन बोटी तसेच मच्छीमारांच्या मदतीने बचाव मोहीम राबवण्यात आली त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तेरा लोकांच्या मृत्यू पावल्याची  वृत्तीची पुष्टी केली असून रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते मृत्यूच्या वारसांना राज्य सरकार तर्फे पाच लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेले आहे.

 

 

बचाव पथकाने लाईफ जॅकेट घालून अनेकांना समुद्रकिनारी आणले त्यापैकी काही बेशुद्ध अवस्थेत  होते बुडालेल्या लोकांना सीपीआर देऊन वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

गेट ऑफ इंडिया पासून दहा किलोमीटर अंतरावरील नीलकमल येथे बोट पोचली. थोड्याच वेळात उजव्या बाजूने आलेल्या स्पीड बोटीचे नियंत्रण सुटून ती प्रवासी नावेवर धडकली दोन्ही बोटी यामध्ये बुडाल्या. पंधरा मिनिटानंतर दुसरी बोट आली. व त्यांच्या मदतीने 101 लोकांना वाचण्यात येश आले.

 

काही बालकांचा देखील समावेश आहे.. अनेक वाचलेल्या प्रवाशांनी आपली घटना कशी झाली ते सांगितले अनेकांनी लाईफ जॅकेट घातल्याने ते पोहत राहिले. समोरून आलेल्या स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक दिली. बोटीला छिद्र  पडून पाणी आत येऊ लागले.  नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी  लाइफ जॅकेट घातले व मदतीसाठी आलेल्या बोटीमध्ये आश्रय घेतला. अशी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यूचा आकडा अजूनही वाढू शकतो.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे