क्रांतिनगर मधे नायलॅान मांजा मुळे ट्रान्सफॅार्मर ला आग*

*क्रांतिनगर मधे नायलॅान मांजा मुळे ट्रान्सफॅार्मर ला आग*
नाशिक जनमत नायलॅान मांजा मुळे शॅार्ट सर्किट होऊन
ट्रान्सफॅार्मर ला
आगल्याने नागरीकांमधे मोठ्याप्रमाणात धावपळसुरु झाली.वेळेत राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी घटणा स्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने सदरील आग आटोक्यात आणल्याने मोठी जीवित व वित्तीय हाणी टळली.
क्रांतिनगर,रामवाडी,हनुमानवाडी तसेच नवनाथ नगर अशा दाट वस्तीतील ओवर हेड वायर्स भुमिगत करण्यात याव्यात सदरील भागातील ट्रान्सफॅार्मरची नियमित देखभाल करण्यात यावी.नव्याने वायर्स टाकून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी ॲड.सुरेश आव्हाड यांनी पंचवटी विभागीय उपअभियंता श्रीमती बाविस्कर मॅडम यांच्याकडे करण्यात आली.तसेच अनेकांनी अग्णीशमन विभागाच्या १०१ नंबरला फोन करुन देखील वेळेत मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांना नाराजी व्यक्त केली,त्याबाबत ॲड.सुरेश आव्हाड यांनी पंचवटी विभागीय अधिकारी श्री.शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधून अग्णीशमन विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी.
अशी मागणी करण्यात आली.
तसेच पशु,पक्षी,प्राण्यांचा व मानवांचा जीव धोक्यात घालणार्या व सार्वजणिक मालमतेला मोठ्या प्रमाणात हाणी पोहोचविणार्या नायलॅान मांजाच्या वापराबाबत पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन नायलॅान मांजा चा वापर टाळावा. असे आवाहन यावेळी ॲड.सुरेश आव्हाड यांनी केले.