चाळीसगावचा जि प बांधकाम उपविभागीय अभियंता नाशिक ACB च्या जाळ्यात…. तब्बल चार लाखाची लाच घेताना अटक…..

चाळीसगावचा जि प बांधकाम उपविभागीय अभियंता नाशिक ACB च्या जाळ्यात….
तब्बल चार लाखाची लाच घेताना अटक…..
चाळीसगाव प्रतिनिधी ACB च्या एकाच महिन्यात चाळीसगावात यापूर्वी 2 कारवाया – आता नाशिक विभागाची कारवाई झाल्याने अधिकारी वर्गात खळबळ…
नाशिक जनमत चाळीसगावात एकाच महिन्यात दोन घटना लाच घेण्याच्या घडल्या या मुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे .पैशाचा मोह कुणाला काय करायला भाग पाडेल याचा भरवसा नाही लाखाच्या वर पगार असूनही काही वरिष्ठ अधिकारी केवळ पैशांसाठी कोणाचेही कामे अडवून ठेवतात व पैसा दिल्याशिवाय कामे करीत नाहीत याचा प्रत्यय काल दि 16 रोजी नाशिक येथे आला, चाळीसगावचा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता (जि जळगाव) वर्ग 1, ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते ( रा. अशोक नगर, धुळे ता.जिल्हा धुळे) 57 यास तब्बल 4 लाखाची लाच स्वीकारताना गडकरी चौक नाशिक येथे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे यामुळे चाळीसगाव येथील शासकीय कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली असून याच महिन्यात चाळीसगाव येथे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 कारवाया केल्या तर तिसरी कारवाई नाशिक विभागाने केली यावरून कार्यालयीन कामकाजात चाळीसगाव तालुका हा किती भ्रष्टाचाराकडे जात आहे यावरून दिसते तसेच एकाच महिन्यात तीन कारवाया झाल्या . यामुळे अनेक भ्रष्ट अधिकारी धास्तावले आहेत.
यातील तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची 4 कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात विसपुते याने लाचेची मागणी करून 4 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यास गडकरी चौक नाशिक येथे ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक 9371957391, माधव रेड्डी
अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक 9404333049, नरेंद्र पवार
वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल राजपूत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक 9403234142/ 9371957195 पो.ना.प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो. ना. अविनाश पवार, पो.ना.सुरेश चव्हाण
सर र्यांनी.प्र.वि. नाशिक यांनी कारवाई केली आहे.
या घटनेमुळे बांधकाम विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.