नाशिक मध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराच्या गळ्याला 75 टाके. गंभीर जखमी..

दुचाकीस्वाराच्या गळ्याला नायलॉन मांजामुळे 75 टाके.
नाशिक जन्मत नासिक पोलिसातर्फे नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात असून अनेकांना तडीपार देखील केले जात आहे. तरी पण काही व्यवसायिक कायद्याची भीती न बाळगता सरसपणे नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे दिसत आहे. काल नासिक मध्ये बहिणीला मुलगा झाल्याने आनंदात दुचाकीवरून पेढे घेऊन निघालेल्या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या गळ्याला ७५ टाके पडले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मुशरन सय्यद (वय २५ रा. अशोका मार्ग) हा मेनरोडवरील एका कपड्याच्या दुकानात काम करतो. बहीण बाळंतीण झाल्याचा निरोप मिळाल्याने सोमवारी (दि. ६) सायंकाळी त्याने कामावरून लवकर सुटी घेऊन दुचाकीवरून बहिण-भाच्याला भेटण्यासाठी पेढे
नाशिक जिल्ह्यातील येवला सिन्नर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक नायलॉन मांजा मुळे जखमी झालेले आहेत.
वडाळा परिसरातील घटना; तरुण गंभीर
घेऊन निघाला. वडाळा नाका परिसरात उड्डाण पुलाजवळ त्याच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. काही कळायच्या आत त्याचा गळा कापला जाऊन तो खाली कोसळला. प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. नागरिकांनी त्याला तत्काळ मुंबई नाक्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या गळ्याला तब्बल ७५ टाके पडले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना घडतच असून, विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.