ब्रह्माकुमारी पूनमदिदींचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन! म्हसरूळ येथील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात कार्यक्रमाचे आयोजन
ब्रह्माकुमारी पूनमदिदींचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!
म्हसरूळ येथील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक – प्रतिनिधी
म्हसरूळ येथील नाशिक जिल्हा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ‘प्रभू प्रासाद'(भवन) राजयोग सेवाकेंद्रात ब्रम्हाकुमारी पूनमदीदी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सौ.बेबीताई भास्कर सोनवणे यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी ब्रह्मकुमारी पूनमदीदी यांनी आत्मा-परमात्मा, सृष्टीचक्र, मन-बुद्धी-संस्कार याबद्दल माहिती देत ताणतणाव मुक्ती तसेच मनःशांतीसाठी ब्रह्माकुमारीच्या राजयोग(मेडिटेशन)ची आवश्यकता विविध उदाहरणे देत विनामूल्य या ब्रह्माकुमारी विद्यालयात प्रवेश घेत कोर्स करण्याचे आवाहन केले व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मांजरगाव ता.निफाड येथील लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वंदना सुनील सोनवणे आणि उपसरपंच इंजि.सागर भास्कर सोनवणे यांचा निवडीबद्दल सत्कार करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच उपस्थितीना ताणतणाव मुक्तीसाठीचा मंत्र हे पुस्तक आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीचे नवीन वर्षाचे कालनिर्णय भेट देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी ब्रह्माकुमारी मंगलदीदी,ब्रह्माकुमारी ज्योतीदीदी, धात्रक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय धात्रकसर,दै.लोकनामाचे उपसंपादक धनंजय बोडके,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भाऊसाहेब सांगळे,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप दरगोडे,सागर कंट्रक्शनचे संचालक भास्करशेठ सोनवणे,मा.सरपंच रामनाथ सोनवणे,सोसायटी संचालक सोमनाथ(अध्यक्ष) सोनवणे,सोसायटी संचालक वसंतराव सोनवणे,सरपंच सुनील सोनवणे,मांजरगावचे सामाजिक कार्यकर्ते शरद सोनवणे,इंजि.सागर विंचू,मंगेशभाई सौंदाणे,ब्रह्मकुमार कस्तुभभाई,ब्रह्मकुमार विपुलभाई यावेळी उपस्थित होते.यावेळी स्वागत-प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणेसर यांनी करत ब्रह्माकुमारी पूनमदीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
——–=———–
फोटो कॅप्शन =मसरूळ येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना बेबी सोनवणे समवेत मंगलदीदी,ज्योतीदीदी,बाळासाहेब सोनवणे,भास्कर सोनवणे, धनंजय बोडके, दत्तात्रेय धात्रक,भाऊसाहेब सांगळे, संदीप दरगोडे,सुनील सोनवणे आदि.