पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचवले पोलिसांनी प्राण
नाशिक जनमत. मुंबई दिनांक 16/8/24 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवरून नावाशेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंग वन वर कॉल आला अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलगर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेन 12.4 अंतरावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 02 FX1686 ही रस्त्यात थांबली असून कार मधील एक महिला ब्रिजच्या रेलिंग क्रॉस करून काहीतरी
करीत आहे . त्यावरून पेट्रोलिंग 1 वाहनावर वर असलेले 1)पोलीस नाईक 3018 ललित शिरसाठ 2) पोलीस नाईक 2322 किरण मात्रे 3) पोलीस शिपाई 4341 यश सोनवणे 4) पोलीस शिपाई 12121 मयूर पाटील हे सदर ठिकाणी पोहोचताच महिला नामे रीमा मुकेश पटेल वय 56 वर्ष गृहिणी राहणार मुलुंड मुंबई यांनी ब्रिजवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता वरील पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत तिला सुरक्षित वर काढले. पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.