डका हरी नामाचा. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात चित्रपट ग्राह मधे गर्दी.

नाशिक जनमत. संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील बांधकाम व्यावसायिक श्री मारुती महादू फड सध्या वास्तव्य नाशिक यांचे थोरले चिरंजीव रविंद्र फड यांनी वेगळ्या व्यवसायात पदार्पण करून डंका हरी नामाचा हा धार्मिक चित्रपट बनवला आहे.कोणताही अनुभव नसताना मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार सयाजी शिंदे,अविनाश नारकर , किरण गायकवाड , प्रथमेश जाधव , किरण भालेराव व मराठी मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री शनया ( सोनुल ) यांना बरोबर घेवून अजय, अतुल हया नामवंत गायक यांचे कडून गाणे गायन करून धार्मिक
विषय घेवून आषाढी एकादशी चे निमित्त साधुन ” डंका हरी नामाचा “” चित्रपट दि.१९ जुलै २०२४ पासुन प्रदर्शित झालेला आहे. महाष्ट्रातील साधारणपणे एकशे पन्नास थिएटर मध्ये सध्या हा चित्रपट रिलीज झाला आहे. मराठी चित्रपटासाठी थिएटर उपलब्ध होत नाहीत. परंतु हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट झालेला असल्याने प्रत्येक शहरात सध्या सुरू आहेत. समाजाच्या दृष्टीनं ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आपले जवळ संगमनेर ( घुलेवाडी फाटा ) , लोणी , सिन्नर , श्रीरामपूर येथे सध्या चित्रपट रिलीज झालेला आहेत.