दोन मित्रांची रेल्वे खाली आत्महत्या. रीलच्या नादात भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस. करवर व राठोड कुटुंबावर शोक कळा..
नाशिक जनमत. नाशिकच्या देवळाली भागामध्ये काल दोघी मित्रांनी रेल्वे खाली आत्महत्या केली. या घटनेने करवर व राठोड कुटुंबामध्ये शोक व्यक्त होत आहे दोघी मुले अल्पवयीन आहेत. दररोज वेगवेगळ्या स्टेटस ठेवणाऱ्या दोघे मित्रांनी आपल्याच मोबाईलवर स्वतःचे फोटो ठेवत त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवत रील बनवण्याच्या नादात धावत्या रेल्वे समोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे. हे दोघे मित्र अकरावी पास होऊन बारावी साठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून
सायंकाळच्या सुमारास दुचाकीने रील स बनवण्यासाठी गेले होते .नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील वालदेवी नदीवरील पुलाखाली या दोघांनी दुचाकी उभी केली आणि रेल्वे रुळावर गेले त्याचवेळी दोघांनी धावती रेल्वे येत असल्याचे बघून तिच्यासमोर उडी मारत आपले जीवन संपवल्याचे समजते या घटनेत नाशिक रोड येथील गीते मळा कपाट कारखान्याच्या मागे राहणारा सचिन करवर व 17 व संकेत राठोड मसोबा मंदिर गीते मळा नाशिक रोड या दोघांचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी रेल्वे पोलिस तपास करत आहे