बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेत (१९ वर्षांखालील) इंडिया बी तर्फे साहिल पारखची सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी
बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेत (१९ वर्षांखालील)
इंडिया बी तर्फे साहिल पारखची
सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख १९ वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी करत आहे.
माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख ,निवडक युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबिरातील सहभागी खेळाडूंमध्ये सदर इंटर एन सी ए स्पर्धा खेळवली जात आहे.
अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत साहिलने आतापर्यंतच्या ४ सामन्यात पुढीलप्रमाणे जोरदार फटकेबाजी केली आहे : पहिल्या सामन्यात ६० चेंडूत नाबाद ७५, दुसऱ्यात ३४ चेंडूत ४१ , तिसऱ्यात केवळ ४२ चेंडूतील ६ षटकार व १३ चौकारांसह ९४ व चौथ्या सामन्यात २७ चेंडूत ६५ .
याप्रमाणे ४ डावात १६८ च्या सर्वाधिक स्ट्राइक रेट नी ९१.६७ च्या सरासरीने एकूण २७५ धावा कुटल्या आ
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.