राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल शहराध्यक्ष अँड सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन.
नाशिक जनमत राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली राष्ट्रवादी च्या वतीने निदर्शने करण्यात येऊन नाशिक जिल्हाधिकारी श्री.गंगाथरण,यांना
शहर धान्य वितरण अधिकारी यांचे नेमनूक करून पूरवठा खात्याचा कारोभार योग्य व सुरळीत करण्यात यावा,संजय गांधी योजनाचा कारोभार सुलभ व सोईस्कर करण्यात येऊन जातीचे दाखले त्वरित वितरीत करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात म्हटले आहे की,
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील पुरवठाखातेचा कारोभार हा बिनभरोशे व अधिकारी विना सूरू असल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ञास सहन करावा लागत आहे. शहर धान्य वितरण अधिकारी नसल्याने नागरिकांच्या हक्काचे रेशनवरील धान्य वेळेत मिळत नाहीत तसेच मोठ्याप्रमाणावर नविन शिधापञिका, विभक्त शिधापञिका, दुय्यम शिधापञिकांसाठीचे अर्ज अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक पाञ व गरिब, गरजू शिधापञिका धारकांना ऑनलाईन नावे नसल्याने व सदरील ऑनलाईन चे काम बंद असल्याने रेशन वरील धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.सदरील पुरवठा विभागाकडे केशरी शिधापञिका शिल्लक नसल्याने अनेकांना नविन शिधापञिका वितरीत केल्या जात नाही. त्यामुळे अनेक गरजूंना वैद्यकिय सेवांचा लाभ मिळत नाही. शिधापञिकेतील नावे कमी करणे, नावे वाढविणे, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारे दाखले देखील वेळेत मिळत नसल्याने नागरिक ञस्त झालेले आहेत. रेशन दुकांनावर देखील अधिकारी नसल्याने अंकुश राहिलेला नाही. तरी त्वरीत केशरी शिधापञिका उपलब्ध करूण देण्यात येऊन त्वरीत नविन शिधापञिका वितरीत करण्यात याव्या. शहर धान्य वितरण अधिकारी यांची नेमणुक करण्यात येवुन पुरवठा खात्याचा कारोभार सुरळीत करण्यात यावा.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांपासून अनेक लाभार्थी यांना केवळ शासकिय अधिकारांच्या मनमानी कारोभारामुळे वंचित रहावे लागत आहे. वयोवृध्द, निराधार, विधवा, दिव्यांग, परीतक्त्या अशा समाजातील घटकांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी संजय गांधी योजनेअंतर्गत अर्थसाहय्य केले जाते. माञ सदरील योजनांच्या अधिकाऱ्यांकडे इतर विभागाचा अतिरिक्त भार असल्याने नागरिकांना वारंवार लाभासाठी चकरा माराव्या लागत आहे. तसेच सदरील विभागामध्ये लाभार्थ्यांची योग्य अशी माहिती पुरविली जात नसून केवळ काही व्यक्तिंव्दारे आलेल्या अर्जांचांच विचार केला जात असून अनेकांची प्रकरणे जाणून बुजून रद्द केली जात आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन-तीन महिने अनुदान जमा होत नसल्याने लाभार्थ्यांना ञास सहन करावा लागत आहे.अनेक महुलांकडे जन्माचा पुरावा उपलब्ध नसल्याने शासकीय रूग्णालया मार्फत दिलेले वयाचे साके ग्रुहीत धरण्यात यावे,संजयगांधी योजणेसाठी नेमलेले अधिकारी जाणून बुजून लाईटबिल अधिक का आले,घरोट्टी एवढी कशी भरतात,इत्यादी कारणे सांगून प्रकरण फेटळुन लावत असतात.तरी सदरील प्रकरणाची दखल घेण्यात यावी. सदरील खात्यामध्ये सु-सुञता आणून सदरील योजनांचा लाभ गरजू व पाञ लाभार्थ्यांना सुरळीत पणे मिळावा यासाठी योग्य ती उपाय योजना करण्यात यावी. सदरील खात्याची चौकशी करण्यात येवून दोषिंवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. पुर्ण वेळ अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात यावी.
गेल्या अनेक दिवसांपासून जात प्रमाणपञ(जातीचा दाखला) वितरीत करण्याचे काम बंद असून सदरील विभागाकडून वेळ काढू पणा केला जात असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी चक्करामाराव्या लागत असून नाहक ञास सहन करावा लागत आहे. तरी जात प्रमाणपञे त्वरीत वितरीत करण्यात यावीत.
सबब सदरील मागण्यांचा त्वरीत विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येऊन सदरील मागण्याचा त्वरित विचार न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला.यावेळी ॲड. सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, प्रमोद मंडलिक ,गणेश मोरे, बाळासाहेब खोंडे,ॲड . सुभाष गिते ,ॲड. शाम तावरे,ॲड. संदीप दंडगव्हाण ,ॲड. नितीनजाधव, रेखा शेलार,भारतीताई चित्ते, चंद्रकला बोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.