ब्रेकिंग

ह भ प त्र्यंबक बाबा निगळ .यांचे निधन. सातपूरकर शोकाकुल.

हभप त्रंबक बाबा निगळ यांचे निधन *वारकरी संप्रदायाचे एक निष्ठाव़त पाईक म्हणजे निगळ बाबा-आण्णासाहेब महाराज आहेर*—————————– नाशिक – महानगरपालिकेचे गार्डन विभागाचे सेवा निवृत्त कर्मचारी व राष्ट्रपती पारितोषिक विजेते निष्काम अखंड वारकरी संप्रदायाचे दिंडी व किर्तनात विणेकरी म्हणून सेवा केलेले हभपश्री त्र्यंबक खंडु निगळ एक निष्ठावंत पाईक होते, असे विचार वारकरी महामंडळ नाशिक अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी त्यांना श्रध्दांजली वाहतांना व्यक्त केले. नुकतेच हभप त्र्यंबक खंडु निगळ यांचे दुःखद निधन झाले, त्याच्या वासाळी येथे निवासस्थानी शोकसभेत बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारकरी महामंडळाचे नाशिक संपर्क प्रमुख हभपश्री शरद महाराज थोरात होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री भाऊसाहेब महाडीक,हभप सुमनताई पाटील, हभपसौ सुमनताई शिंदे,पुत्र श्री देवीदास निगळ,श्री सोमनाथ निगळ आदी उपस्थित होते.यावेळी हभपश्री शरद महाराज थोरात म्हणाले त्र्यंबक बाबांचे सेवा कार्य दिल्ली पर्यंत पोहोचले. मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे हस्ते गुणगौरव झाला ,सुमनताई पाटील म्हणाल्या आपले परिसराचं भुषण म्हणजे निगळ बाबा,सुमनताई शिंदे म्हणाल्या बाबा वैभवात वाढले पेंन्शनर असुनही कधीही गर्व केला नव्हता,बिल्डर्स श्री देवीदास शेठ निगळ यांनी ही शोक प्रगट करुन निगळ बाबा यांच्या आठवणी सांगितल्या.बाबांनी आमचे कुटूंबावर संस्कार घडवले म्हणून मी फक्त सातवी पास व पंतप्रधान हे दोन चित्रपट काढले. वासाळी येथे चित्रपटाचे सुटींग साठी मुंबई बाहेरूनही कलाकार येऊन शुटींग करतात,स्माल फिल्म स्टुडीओ व संगिताचेही काम येथेच आपले बंगल्यावर होते,बाबांचे आशिर्वादाने त्र्यंबकेश्वर,शिर्डीरोड,पालघर, नाशिक येथे पण शेती घेतली आहे.हे सर्व बाबांचे कृपेच फळ आहे असेही श्री देवीदास शेठ निगळ म्हणाले.पाठीमागे दोन मुले श्री देवादास त्र्यंबक निगळ,श्री सोमनाथ त्र्यंबक निगळ तीन मुली आक्का पगार,मिरा बर्वे,मंगल रानडे, दोन सुना सौ.रत्ना देवीदास निगळ,सौ.सविता सोमनाथ निगळ, आतिष निगळ,साईराज निगळ,सोनू पगार,तेजल बर्वे,तन्वी निगळ, नातू नाती असा परिवार आहे.त्यांचे निधनाबद्दल जनमत चे संपादक चंद्रकांत धात्रक खानदेश मीडियाचे संपादक श्री पाटील, एबीबी व स्टार माझाचे श्री लक्ष्मणजी घाटोळ, वारकरी महामंडळाचे जिल्हासचिव हभपश्री लहू महाराज अहिरे जिल्हा संपर्कप्रमुख हभपश्री त्रंबक नाना भंदुरे, संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्ट सदस्य हभपसौ कांचनताई उकार्डे, तालुकाध्यक्ष भरत महाराज मिटके, जिल्हा संघटक हभपश्री सुदर्शन महाराज शिंदे, शहर संपर्कप्रमुख शरद महाराज थोरात, केंद्रीय मंत्री सौ भारतीताई पवार, आमदार सौ. सीमाताई हिरे,मा.श्री महेश हिरे, पालकमंत्री माननीय श्री दादासाहेब भुसे माजी पालकमंत्री छगनजी भुजबळ साहेब, खासदार श्री हेमंत आप्पा गोडसे, माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव, नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव, नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील नगरसेवक शशिकांत जाधव, नगरसेवक सलीम मामा शेख,नगरसेवक श्री भागवत आरोटे, नगरसेविका इंदुबाई सुदाम नागरे, नगरसेविका सीमाताई निगळ, नगरसेविका माधुरी गणेश बोलकर, जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, रायगड प्रतिष्ठानचे श्री समाधान जी देवरे, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हभपश्री निवृत्ती महाराज कापसे,हभप श्री भगवान कापसे गणेशगांव, हभपश्री विठोबा कापसे गणेश गाव, यांनी हे दुःख व्यक्त केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे