दिंडोरीतून गावितची माघारी . भाजपाला पराभूत करण्यासाठी उचलले पाऊल. शरद पवारांच्या शब्दाला मान.

नाशिक जनमत. शरद पवार यांच्या शिष्टेला यश आल्याने अखेर महाविकास आघाडीचा घटक पक्ष माकपाचे माजी आमदार जेपी गावित दिंडोरीतून माघारीच राज्य झाले आहेत भाजपला पराभूत करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर यांनी म्हटले आहे
दिंडोरीची एकमेव जागा माकापासाठी सोडावी अशी गावीत याची इच्छा होती मात्र जागा वाटपात ती पवार गटाकडे गेली त्यानंतर या जागेवर माक्प ने दावा कायम ठेवत गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तरीही आघाडी कडून गावीत्यचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करतेवेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर सभेत आघाडीच्या उमेदवारांचे गणित बिघडवण्यासाठी एका माजी आमदाराने भाजपचे कंत्राट घेतल्याचा आरोप केला. या आरोपाने माकापा सह गावित यांनी आक्षेप घेत आता माघार घ्यायचीच नाही. असा पवित्र घेतला होता यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढून मत विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून पुन्हा एकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावीत बरोबर चर्चा सुरू केली. जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड. अनिल कदम. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल .माजी आमदार नितीन भोसले .यांनी गावीत त्यांना सोबत घेत दोन दिवसापूर्वी जळगावच्या डोळ्यावरअसलेले शरद पवार यांच्याशी भेट घालून दिली. या चर्चेस गावीत त्यांनी पुन्हा आघाडीच्या नेत्यावरील नाराजी बोलून दाखवली. त्यावर पवार यांनी गावीत याना आघाडीचा धर्म पाळण्याबाबत आणि सभेत पाटील यांचे वक्तव्य गावित यांच्या विषयी नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी चे प्रतर दिले. आणि यानंतर गावीत त्यांनी माघार घेण्याचे मान्य केले .याचा फायदा महायुतीला v मा विकास आघाडीला किती होतो . नातेवाईक संबंध मुळे भाजपाच्या भारती पवार यांना किती फायदा होतो याकडे मतदारांचे लक्ष आहे.