जलजीवन मिशन योजनेत सरपंच व ग्रामपंचायतीचे अधिकार कायम ठेवा इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना सरपंचांकडून निवेदन
जलजीवन मिशन योजनेत सरपंच व ग्रामपंचायतीचे अधिकार कायम ठेवा
इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना सरपंचांकडून निवेदन
बेलगाव कुऱ्हे : लक्ष्मण सोनवणे
जलजीवन मिशन अंतर्गत हस्तांतरित करण्याचे अधिकार सरपंचांकडून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर योजनेत सरपंचांचे व ग्रामपंचायतीचे अधिकार कायम ठेवावे या मागणीसाठी इगतपुरी तालुका सरपंच सेवा महा संघाच्या अध्यक्षा तथा सांजेगावच्या लोकनियुक्त सरपंच निताताई गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना तालुक्यातील सरपंचांनी नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी सर्व सरपंचांची छोटी बैठक झाली त्यात टिटोलीचे उपसरपंच अनिल भोपे यांनी सांगितले की, येत्या 26 तारखेला प्रजाकसत्ताक दिनी सदर विषयाबाबत तालुक्यातील 96 ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहोत. निवेदनात म्हटले आहे की, जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पाणी पोहचविण्यासाठी केंद्र सरकारकरचे महत्वपूर्ण ध्येय आहे. अतिदुर्गम भागात गतिमान योजना राबविण्यासाठी सरपंच महत्वाचा दुवा आहे. मात्र जलजीवन मिशन अंतर्गत हस्तांतरित करण्याचे अधिकार सरपंचांकडून काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील सरपंचांनी निवेदन दिले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याकामाच्या संबधात ग्रामपंचायत स्तरावर किंवा सरपंच यांना ते आदेश व कार्यारंभ आदेश व अंदाजपत्रक अद्यापही दाखवण्यात आलेले नाही. तालुक्यात आधीच योजना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येत आहे. त्याचे परिणाम गाव पातळीवर दिसतात. सदर ठेकेदार यांचा मनमानी कारभार होतांना दिसतो. त्याला वचक ठेवण्याचे काम सरपंच करीत असतात. जोपर्यंत योजना ग्रामपंचायतिकडे हस्तांतरित होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बिले अदा करू नये तसेच जलजीवन मिशन योजनेत सरपंचांचे व ग्रामपंचायतीचे अधिकार कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी टीटोलीचे उपसरपंच अनिल भोपे, मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे, कैलास कडू, कोमल सराई, गोविंद भले, आश्विनी भोईर, रेखा वाजे, मनाली पोटकुले, गोकुळ सदगीर, ज्ञानेश्वर करवर, अर्जुन भोर, विष्णू बोटे, सीमा जाखेरे, दौलत भगत, मच्चीन्द्र कुंदे, मथुरा जुगरे, आतिष पंडित, राहुल जगताप, प्रकाश पंडित आदी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते