मनमाड जवळील पाझनदेव धोटाने. येथे पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे होत आहे हाल.. पूल बांधण्याची नागरिकांची मागणी.
नाशिक जनमत प्रतिनिधी समाधान सोमासे
मनमाड शहराजवळ असलेले पांझणदेव धोटाणे बु. येथे रस्ता मनमाड तसेच नांदगाव ला जातो पांझणदेव व धोटाणे बु. दोन्ही गावाच्या मधे पांझण नदी आहे पांझण नदी वरील फरशी पुलावरून दर वर्षी खुप प्रमाणात पुराचे पाणी वाहते त्यामुळे गावातील नागरिकांचे मनमाड नांदगावला जाताना पुलाला पाणी असल्याने हाल होतात. आजारी असलेले पेशंटला दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जाण्यासाठी , विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, गावातील नागरिकांना काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी दर वर्षी पावसाळ्यात ,हाल होतात ह्या पांझण नदीचा उगम जास्त दुरवरून असल्याने मुळे फरची पुलावरून पाणी कमी होत नाही
ह्या वर्षी दिनांक 19/09/2022रविवार पासुन 22/09/2022गुरुवार लगातार 4दिवस पांझण नदी वरील फरची पुलावरून पाणी वाहत होतं पांझणदेव ,धनेर,कोंढार, खांदगाव,अस्तगाव गावातील नागरिकांना मनमाड तसेच नांदगाव ला जाण्यासाठी हाल सहन करावा लागत आहे
पांझणदेव धोटाणे बु.पांझण नदीवर पुलाचे काम मंजूर करून पुल बनवावा अशी मागणी पांझणदेव गावकऱ्यांची व धोटाणे बु. गावकऱ्यांची आहे