ब्रेकिंग

अधिकारी आल्याची बातमी. धावपळीत शाळा गाठताना अपघात तीन शिक्षिका जखमी.

नाशिक जनमत   देवगाव त्रंबकेश्वर येथील शासकीय कन्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनीस मासिक पाळी आल्याने विद्यार्थ्यांनी ला शाळेत वृक्षारोपण करण्यास शिक्षकाने रोखल्याने त्याच्या चौकशीसाठी बुधवारी सकाळी सातला प्रकल्प अधिकारी शाळेत आले. शिक्षकांनाही वार्ता कळताच पार्वती वेग वाढवला आणि त्यांचा अपघात घडला.संबंधित घटना घडल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत असताना राज्य महिला आयोगापासून ते शिक्षण विभागापर्यंत सगळ्यांनीच त्याची गंभीर दखल घेतली चौकशीसाठी मोठ्या धावपळीत शाळा गाठताणा त्यांच्या कारला देवगाव ते घोटी रस्त्यावर अपघात झाला त्यात  3शिक्षकां जखमी झाल्या. सदर शिक्षक हे मुख्यालय येथे न राहता नाशिक येथे राहत होते शाळेत अधिकारी आल्याची बातमी कळतात कार वरील वेग वाढवला गेला आणि वावी हर्ष गावाजवळ वळणावर त्यांची कार उलटली या अपघातात शिक्षिका कविता बेंडकोळी श्रीमती नवले श्रीमती सूर्यवंशी ह्या जखमी झाल्या. दरम्यान नियमानुसार शाळेतील शिक्षकांनी नियुक्त केलेल्या ठिकाणीच राहणे बंधनकारक असते. मात्र अनेक शिक्षक असे न करता आपल्या आपल्या घरून येऊन जाऊन आश्रम शाळेत येतात या घटनेतून पुन्हा ही घटना समोर आली आहे. दरम्यान या शिक्षकांवर काय कारवाई होते याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे