चार चाकी वाहनांसाठी नवीन मालिका 28 जूनला होणार सुरू .प्रदीप शिंदे
दिनांक: 26 जून, 2022
*चारचाकी वाहनांसाठी नविन मालिका 28 जूनला होणार सुरू
*:प्रदीप शिंदे
*नाशिक, दिनांक 26 जून, 2022
प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे चारचाकी वाहनांसाठी ‘एम एच 15 एच वाय’ ही नविन मालिका मंगळवार 28 जुन 2022 पासून सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पंसतीचा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी विहित कार्यपद्धीनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, चाारचाकी वाहनासाठी ‘एम एच 15 एच वाय’ ही नविन मालिकेच्या आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवलेले असून, त्यासाठी शासन नियमानुसार ठराविक शुल्क विहित करण्यात आले आहे. आकर्षक पंसतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करण्याकरीता खालील प्रमाणे कार्यपद्धीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे
*अशी असणार आकर्षक पंसतीचा क्रमांक प्राप्त करण्याची कार्यपद्ध
▪️ आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील 28 जून रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे
▪️ नविन मालिका सुरु होण्याच्या दिनांकास फक्त चारचाकी वाहन संवर्गातील वाहन धारकांचेच आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे अर्ज स्विकारण्यात येणार आहे
▪️ मालिका सुरु झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासुन चारचाकी वाहनधारकांनी पहिल्यादिवशी ज्या आकर्षक पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर केलेले नसतील अशा आकर्षक क्रमांकासाठी इतर संवर्गाच्या वाहन धारकांना अर्ज सादर करता येतील. अशा अर्जदारांना आकर्षक क्रमांकाचे शुल्क हे विहित शुल्काच्या तीनपट शुल्क आकारले जाणार आ
▪️ आकर्षक क्रमांकाचे अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या अर्जदारांच्या पत्त्याच्या पुराव्याची आधारकार्ड, बिजबील, घरपट्टी यापैकी एक साक्षांकित केलेली छायांकित प्रत यासोबतच अर्जदाराचे फोटो ओळखपत्राची आधारकार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट कार्ड यापैकी एक साक्षांकित छायांकीत प्रत सादर करणे आवश्यक आहे
▪️ पसंतीच्या नोंदणी क्रमांच्या शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टव्दारे भरणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा किंवा शेडयुल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक ( R.T.O.NASHIK) यांचे नावे काढून अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आ
▪️ अर्जदराने एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थतीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही. तसेच राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थतीत दुसन्या व्यक्ती संस्थेच्या नावे हस्तांतरीत होणार नाही याची नोंद घ्यावी
▪️ एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल. ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव समाविष्ट असेल अशा अर्जदारांनी लिलावामध्ये भाग घेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी ०४.०० वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्काच्या रक्कमेच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रक्कमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावयाचा आहे. ज्या अर्जदारांच्या बोलीच्या रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट जास्त रक्कमेचा असेल अशा अर्जदारासच पसंतीचा क्रमांक जारी करण्यात येईल. लिलावामध्ये एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात ये
आकर्षक क्रमांकाचे शासकीय विहित शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. असेही, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी कळविले आहे
- 0000000000.ईल..हे..हे…ती*..:***