ठेंगोडाच्या गिरणा पात्रात कोट्यावधीचे ड्रग्स. अजूनही पाण्यात शोध चालू.
नाशिक जनमत नासिक जिल्ह्यातील ठेंगोडा गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात कोट्यावधीचे ड्रगज मिळून आलेले आहे. रात्री बारा वाजेपासून नदीपात्रात शोध मोहीम चालू आहे. ललित पाटील यांचे कार चालक सचिन वाघ याने हे डर्गज फेकल्याची मुंबई पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार देवळा पोलीस आणि मुंबई पोलिस शोध चालू घेत आहे. बोटीच्या साह्याने हा शोध चालू असून कॅमेरे नदीपात्रात सोडले आहे. नदीपात्रात काही गोण्या असल्याचे बोले जात असून अजून ही मोठा साठा नदीपात्रात मिळून येऊ शकतो .किती वर्षापासून हा व्यवसाय चालू होता. ललित पाटील भूषण पाटील सचिन वाघ या छोट्या माशा न बरोबर अजून किती मोठे मासे या ड्रग्स प्रकरणात अडकले आहेत त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा व त्यांची नावे जनतेसमोर आणावीत अशी मागणी सध्या नागरिक करत आहे. दरम्यान नाशिक जिल्हा व नाशिक शहराचे नाव सध्या यामुळे संपूर्ण भारत सह जगात गाजत आहे आपले नाशिक शहर धार्मिक शहर म्हणून जगात ओळखले जाते कुंभमेळा भरणाऱ्या या शहरांमध्ये ड्रग्स चां व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने चालू होता. मुंबई पोलिसांना याचा सुगावा लागला परंतु स्थानिक शहरी व ग्रामीण नाशिक पोलिसांना ड्रग्स कारखाने व व्यवसायाची साधी चाहुल देखील लागली नाही. या व्यवसायाचा कुणाकुणाला हप्ते चालू होते. यात राजकारणी. पोलीस. आहेत का याचा तपास करून त्यांची नावे जनतेसमोर आणायची मागणी केली जात आहे. नदीपात्रामध्ये ड्रग्सचां शोध घेतला जात आहे. जवळपास 100 किलो ड्रग्स मिळण्याची असून त्याची आंतरराष्ट्रीय किंमत 100 करोड रुपयांच्या वर असू शकते.. दरम्यान ही सर्व माहिती लवकरच पुढे येईल. दरम्यान पुन्हा ड्रग्स प्रकरण चालू झाले.आहे . हजारो युवक वर्ग व्यसनाधीन करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.