ब्रेकिंग

बीसीसीआयच्या मुश्ताक अली ट्रॉफीत सत्यजित बच्छाव व ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीने महाराष्ट्राचा विदर्भावर विजय

:

 

 

 

 

 

बीसीसीआयच्या मुश्ताक अली ट्रॉफीत

 

सत्यजित बच्छाव व ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीने महाराष्ट्राचा विदर्भावर विजय

 

 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेत विदर्भ संघावरील विजयात महाराष्ट्र संघातर्फे ४ बळी घेत तर ऋतुराज गायकवाड ने शतक झळकावत मोठा वाटा उचलला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयची हि मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धा मोहाली येथे होत आहे.

 

प्रथम फलंदाजी करत विदर्भने २० षटकांत ९ बाद १७७ धावा केल्या . ध्रुव शोरेने सर्वाधिक ६२ धावा केल्या . महाराष्ट्र संघातर्फे सत्यजित बच्छावने सर्वाधिक ४ ( ४ षटके २३ धावात ४ बळी ) , तर प्रशांत सोळंकीने २ बळी घेतले. उत्तरादाखल महाराष्ट्र संघाने ऋतुराज गायकवाडच्या नाबाद १०२ धावांच्या जोरावर १६.१ षटकांत २ बाद १८० धावा करत ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. केदार जाधवने ४२ धावा केल्या.

 

 

महाराष्ट्राचा पुढील सामना : २७ ऑक्टोबर – राजस्थान .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे