*ग्रामपंचायत वडझिरे येथे जप्त मालमत्तेचा*
*6 मार्च रोजी होणार लिलाव*
*नाशिक,दिनांक: 5 फेब्रुवारी, 2024 वृत्तसेवा):*
सिन्नर तालुक्यात स्टोनक्रशर करीता वापरण्या येणारे दगरड तसेच दगड खाणीतून उत्खनन व वाहतूक करून वापरण्यात आलेल्या दगडाकरीता गौणखनिज स्वामित्वधनाच्या रकमा शासनास जमा न केल्यामुळे खाणपट्टाधारक यांच्या स्थावर मालमत्तेचा 6 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जाहिर लिलावाने विक्री करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसिलदार सुरेंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
तहसिलदार सिन्नर यांनी सदर स्थावर मालमत्ता जप्तीचे अधिपत्र नमुना नंबर 4 नुसार जप्त करण्यात आले आहे. तसेच मिळकतीचे इतरअधिकारात अनधिकृत गौणखनिज दंड व सरकार बाकीपोटी जप्त असे नाव दाखल केले आहे. जप्त करण्यात आलेली स्थावर मालमत्ता ही मिळकतदार सौ. सखुबाई सुदाम सांगळे, राहणार वडझिरे, तालुका सिन्नर यांची असून मिळकतीचा गट क्रमांक 121/2 पै. क्षेत्र 2.97 हे.आर पो.ख. 0.59 हे.आर असे एकूण 3.56 हेक्टरआर इतके आहे.
सदर मिळकतीचा लिलाव 6 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, वडझिरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी विक्री करून दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी जप्त केलेल्या मालमात्तांची लिलावाची तारीख निश्चित करण्यात येत आहे. असेही तहसिलदार सुरेंद्र देशमुख यांनी कळविले आहे.