गोकुळ गीते यांना विजयाची खात्री. अर्ज भरल्या दिवसापासूनच प्रचार चालू.
निवडणुकीची चूरस वाढली. तिहेरी निवडणूक होणार.

नाशिक जनमत काल माघारीचा दिवस असल्याने गोकुळ गीते माघार घेतात का याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले होते. अखेर ते निवडणुकीच्या रिंगणात आल्याने निवडणुकीमध्ये चूरस वाढली असून तेहेरी लढत नागरिकांना बघण्यास मिळणार आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघारीवरून ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर भाजपच्या गणेश गितेंनी निवडणुकीतून माघार घेतली खरी. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गिते यांच्या माघारीवरून राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळाली. कुणाल दराडेंनी आपला ‘बाप’ काढल्याच्या गोकुळ गिते यांच्या आरोपावरून शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या शह-काटशहाच्या राजकारणानंतर आता नरेंद्र दराडेंसमोर गितेंचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

परिषदेसाठी नाशिक विधान गुरुवारी (दि. ४) माघारीचा अखेरचा दिवस होता. त्यात महायुतीतील घटकपक्षांनी शिवसेनेच्या दराडेंसमोर बंडखोरी केल्याने ही बंडखोरी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान होते. भाजपचे स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकुळे मुख्यमंत्री गिते यांचे आव्हान मोडोल काढण्यासाठी थेट फडणवीस आणि मंत्री महाजन यांनी गणेश गितेंना मंगळवारीच मुंबईला पाचारण केले होते. त्यामुळे पक्षाचा आदेश मान्य करीत गितेनी माघारीची मानसिक तयारी केली. परंतु, गोकुळ गितेच्या माघारीच्या प्रयत्नांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठे राजकीय नाट्य रंगले. गणेश गिते यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्जमाघारीची प्रक्रिया सुरू केली. परंतु, बंधू गोकुळ गिते ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क झाला नाही. गोकुळ गीते यांनी कुणाल दराडे यांनी आपला बाप काढला त्यामुळेच आपण निवडणुकीच्या रणांगणात उतरलो. आपल्या घरात एक आमदार असून आम्हालाही एक चान्स द्या. पुन्हा अशी संधी नाही असे फोनवरून सांगितले. दरम्यान निवडणुकीमध्ये मतदार गोकुळ गीते यांच्या मागे असून मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. निफाड तसेच इतर भागातील मतदार मागील आमदारांवर नाराज असल्याचे गोकुळ गीते यांनी बोलून दाखवले. मतदार तसेच नागरिकांमध्ये देखील गोकुळ गीते हे नक्कीच विजय होतील अशी चर्चा सध्यातरी रंगली आहे. आठ वर्षात मतदार संघात कोणती कामे झाली नसल्याचे गोकुळ गीते यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात मतदार नगरसेवक आपल्या सानिध्यात असल्याचे गोकुळ गीते यांनी प्रसार माध्यमांशी बोलून दाखवले. दरम्यान अर्ज भरल्यापासूनच आपली माघार नाही. असे त्यांनी बोलून दाखवले. अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच आपला प्रचार त्यांनी चालू केला आहे. गोकुळ गीते यांच्या विजयाची त्यांच्या कार्यकर्ते नातेवाईक व मतदारांना खात्री असल्याचे नातेवाईक बोलत आहे.


