एक झाड आईच्या नावाने नाशिक शहरातील अनेक शाळेमध्ये 5000 झाडांची लागवड

*नाशिक जनमत नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या माध्यमातून उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘हरित कुंभ हरित मान्सून’ उपक्रमांतर्गत तसेच एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये 5000 पेक्षा अधिक वृक्ष लागवड*
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत मनपा क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये विशेष ‘हरित कुंभ-हरित मान्सून’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते.
मा.ना.गिरीश महाजन,मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेल्या उन्नत नाशिक अभियाना अंतर्गत नाशिक शहराचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी, हवामान बदलावर मात करण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराला ‘हरित व सुंदर शहर’ बनवण्याच्या उद्देशाने ‘उन्नत नाशिक अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत यंदाच्या मान्सून हंगामात नाशिक शहर व परिसरात १ लाख विविध देशी वृक्षांच्या लागवडीचे व संवर्धनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमात शैक्षणिक संस्थांचा (शाळा, महाविद्यालये) सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप व मनपा आयुक्त मनीषा खत्री व मनपा पदाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार व शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये विशेष ‘हरित कुंभ-हरित मान्सून’ उपक्रम आयोजित करण्यात येऊन शाळांच्या तसेच काही NgO यांच्या सहभागातून शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांच्या अधिपत्याखाली वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करतांना
१)शाळेच्या परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागेवर, मैदानावर किंवा योग्य ठिकाणी देशी प्रजातींच्या झाडांची शास्रोक्त पद्धतीने लागवड करावी.
२)उपलब्ध बियाण्यांचे ‘Seed Ball’ तयार करून त्यांचे रोपण करणे किंवा परिसरात त्याचा वापर करणे.
३) प्रतिज्ञेच्या माध्यमातून किंवा पर्यावरणपूरक संवादातून विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देणे व या लोकचळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग नोंदविणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
या उपक्रमा मधून 5000 पेक्षा अधिक रोपांची लागवड झाल्या विषयी माहिती शिक्षण विभागाकडून दिलेल्या लिंक मध्ये शाळांनी भरलेली आहे.
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण झालेल्या झाडांच्या जिओ टॅग फोटोची एक पेड मा के नाम या पोर्टलवर देखील नोंदणी करण्याविषयी सूचना सर्व शाळा देण्यात आलेल्या आहेत.
या वृक्षांचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन करण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आलेले आहे.



