मोरांची शिकार दोन सराईत शिकारी अटकेत दापूर येथील घटना
गावठी छर्याची बंदूक जप्त. बॅटरी व दोन मोरांचे मृत्यू देह जप्त

सिन्नर : भारताचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या मोराची शिकार करणाऱ्या दोन जणांना दापूर येथील राखीव वन क्षेत्रातशिकार केली म्हणून अटक करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव वन परिमंडळांतर्गत दापूर येथील राखीव वनक्षेत्रात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणाऱ्या दोन सराईत शिकाऱ्यांना वनविभागाने शुक्रवारी (दि. १७) मध्यरात्री रंगेहात पकडले. या कारवाईत स्थानिक साहित्यापासून तयार केलेली गावठी छन्ऱ्याची बंदूक, दोन मृत मोर आणि टॉर्च जप्त करण्यात आला असून, अंधाराचा फायदा घेत त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संशयित सागर बाळू आगीवाले (रा. नांदूर शिंगोटे) आणि सुनील लक्ष्मण निरगुडे (रा. शिवडे) यांचा समावेश आहे. तर संशयित रवी मेंगाळ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार असून, त्याचा
शोध सुरू आहे. दापूर येथील गट क्रमांक ४३७ मधील ७० हेक्टरच्या रोपवन वनक्षेत्रात मोरांची शिकार होणार असल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ अधिकारी
तानाजी भुजबळ, प्रीतेश सरोदे, वनरक्षक आकाश रूपवते तसेच वन्यजीव बचाव पथकाचे रोहित लोणारे, निखिल वैद्य आणि स्थानिक वनसंरक्षण समितीच्या सदस्यांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. मध्यरात्री



