ब्रेकिंग

अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयाची धडक कारवाई दि.28.05.2026 पासून ते आजपर्यन्त सात दिवसांत रु. 15,89,533/- किंमतीचा अन्न पदार्थाचा साठा जप्त

नाशिक जनमत  प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयाची धडक कारवाई दि.28.05.2026 पासून ते आजपर्यन्त सात दिवसांत रु. 15,89,533/- किंमतीचा अन्न पदार्थाचा साठा जप्त

 

ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ, दर्जेदार व सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 29 मे 2026 रोजी मे.कृष्णा आईस्क्रिम, माडसांगवी, जि.नाशिक या पेढीत अनारोग्य परिस्थितीत आईस्क्रिम व फ्रोझन डेझर्ट या अन्नपदार्थाचे उत्पादन सुरु असल्याने तेथून फ्रोझन डेझर्ट हा अन्नपदार्थ कमी प्रतीचा असल्याचे संशयावरुन अन्ननमुना घेवून उर्वरित 8000/- किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

दि.29 मे 2026 रोजी मे.महाराष्ट्र चिक्की, कुंदेवाडी, ता.निफाड, जि.नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना कार्यरत असल्याचे आढळले. त्यामुळे तेथून शेंगदाणा चिक्की हा अन्नपदार्थ कमी प्रतीचा असल्याचे संशयावरुन अन्ननमुना घेवून उर्वरित 71.250 किलो किंमत रु.15,200/- किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

दि.29 मे 2026 रोजी मे.संकेत सुपारी ॲण्ड किराणा स्टोअर्स, चांदवड, जि.नाशिक या पेढीची तपासणी केली असता तेथे रिफाईन्ड सोयाबीन ऑईलची खुल्या स्वरुपात विक्री होत असल्याचे आढळले त्यामुळे तेथून रिफाईन्ड सोयाबीन ऑईल हा अन्नपदार्थ कमी प्रतीचा असल्याचे संशयावरुन अन्ननमुना घेवून उर्वरित 148.4 किलो किंमत रु.22,260/- किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

दि.29 मे 2026 रोजी मे.सरकार फॅमिली पान शॉप, इगतपुरी, जि.नाशिक या पेढीची तपासणी केली असता तेथे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठविलेले असल्याने तेथून 5620/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे व तेथील उपस्थित व्यक्तीविरुध्द व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक/पुरवठादार यांचे विरुध्द इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास इगतपुरी पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

दि.30 मे 2026 रोजी मे.बिन्नर डेअरी, पुणे हायवे, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक या पेढीत अनारोग्य परिस्थितीत खवा या अन्नपदार्थाची विक्री सुरु असल्याने तेथून खवा या अन्नपदार्थाचे 02 अन्ननमुने कमी प्रतीचा असल्याचे संशयावरुन अन्ननमुने घेवून उर्वरित 26 किलो 7,480/- किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे

दि.30 मे 2026 रोजी मे.न्यु इच्छामणी फुड प्रॉडक्टस, खोडेनगर, वडाळा, नाशिक या पेढीची तपासणी करुन तेथून मिक्स फरसाण या अन्नपदार्थाचा अन्ननमुना कमी प्रतीचा व मिथ्याछाप असल्याचा संशयावरुन घेवून उर्वरित 98 किलो 14,700/- किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

दि.31 मे 2026 रोजी मे.श्री रामचंद्र जगदाळे हे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी वाहतूक करतांना आढळून आल्याने त्यांचेकडून 3,43,282/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा व वाहन अंदाजे किंमत रु.1,50,000/- जप्त केले आहे. त्यामुळे सदर उपस्थित व्यक्तीविरुध्द व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक/पुरवठादार यांचे विरुध्द देवळा पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास देवळा पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

दि.02.06.2026 रोजी मे. अंबिका किराणा व जनरल स्टोअर्स, पेठ, ता.पेठ, जि.नाशिक या पेढीची तपासणी करुन पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले Cafenated Beverages (Sting) व Monster Enegy Drink या दोन अन्न पदार्थाचे अन्न नमुने घेऊन उर्वरित रु. 20,880/- किंमतीच्या साठा कमी प्रतीचा असल्याचे संशयावरुन जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

 

 

दि.03.06.2026 रोजी कार्यालयास प्राप्त गोपनीय मा‍हितीच्या अनुषंगे श्री नियाज अहमद मोह.सलीम हे वाहन क्रमांक एमएच 41 बीएम 0715 संगमेश्वर, ता.मालेगाव, जि.नाशिक यांचेकडून मिक्स मिल्क व म्हशीचे दुध हे दोन अन्ननमुने घेवून उर्वरित 58 लिटर, किंमत रु.2418/- किंमतीचा साठा कमी प्रतीचा असल्याचे संशयावरुन जप्त करुन सदरचा साठा नाशवंत असल्याकारणाने नष्ट करण्यात आला आहे.

दिनांक 03 जुन 2026 रोजी मे.चंद्रशेखर ट्रेडर्स, गिरणारे, ता.जि. नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले Refined Soyabean Oil हे खुल्या स्वरुपात विक्री होत असल्याने या Refined Soyabean Oil अन्न पदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित रु. 74,624/- किंमतीचा साठा कमीप्रतीच्या संशयावरुन जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

दिनांक 03 जुन 2026 रोजी मे.आर.के. एंटरप्रायजेस, सिन्नर, जि. नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले Refined Soyabean Oil हे खुल्या स्वरुपात विक्री होत असल्याने या Refined Soyabean Oil अन्न पदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित रु. 74,624/- किंमतीचा साठा कमीप्रतीच्या संशयावरुन जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

दि.03 जुन 2026 रोजी श्री अमित अशोक तोडकर हे बाळकृष्ण निवास, पेठरोड, पंचवटी, नाशिक येथे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवणूक करतांना आढळून आल्याने त्यांचेकडून 4,26,584/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे सदर उपस्थित व्यक्तीविरुध्द व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक/पुरवठादार यांचे विरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

दि.03 जुन 2026 रोजी श्री किरण देविदास खंदारे यांनी मोती सुपरमार्केटजवळ, पेठरोड, पंचवटी, नाशिक येथे वाहन क्रमांक एमएच 02 बीडी 1055 मध्ये महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी वाहतूक करतांना आढळून आल्याने त्यांचेकडून 3,75,640/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा व वाहन अंदाजे किंमत रु.1,00,000/- असा जप्त केला आहे. त्यामुळे सदर उपस्थित व्यक्तीविरुध्द व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक/पुरवठादार यांचे विरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

दि.03 जुन 2026 रोजी श्री शामसुंदर गुप्ता यांचेकडून महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवणूक करतांना आढळून आल्याने त्यांचेकडून 9,208/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे सदर उपस्थित व्यक्तीविरुध्द व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक/पुरवठादार यांचे विरुध्द मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुंबई नाका पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. तुकाराम मुंडे, अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, मुंबई यांच्या निर्देशनाखाली व श्री. श्रीकांत करकाळे, सह आयुक्त (अन्न) नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अमित रासकर, श्री. संकेत येलमामे, श्री. गोविंदा गायकवाड, श्री वैभव गर्दे, श्रीमती सु.दे.महाजन, श्रीमती ऋतुजा नवले, श्री अक्षय खेडकर, श्री. संदिप तोरणे, श्री. प्रतिक भड, श्रीमती सोनल पाडळे, श्री चेतन परदेशी, श्री. सुहास मंडलिक, श्री अक्षय गाडेकर, श्री उमेश सुर्यवंशी यांनी श्री. मनिष सानप, श्री विनोद धवड, श्री. संदिप देवरे व श्री. दिनेश तांबोळी, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके तयार केली असून ते जिल्हयातील व शहरातील उत्पादक व विक्रेते यांचेवर लक्ष ठेवणार असून कधीही अन कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत.

​प्रशासनातर्फे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे