30 31 तारखेस नवीन महापौर उप महापौर नाशिकचे होण्याची शक्यता.

30 31 तारखेस नवीन महापौर उप महापौर नाशिकचे होण्याची शक्यता.
नाशिक जन्मत नाशिक महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिक महानगरपालिकेत नवीन महापौर उप महापौरा विषयी नाशिक करण मध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान भाजपचाच महापौर बसणार असल्याचे चित्र आहे
. महापालिकेत महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी ३० किंवा ३१ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे तशी सूचना प्राप्त झाली असून, महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
नव्याने प्राप्त आदेशानुसार, २२ जानेवारीला महापौरांचे आरक्षण जाहीर करावे. महापौर व महापौरपदासाठी निवडणूक घेण्यासाठी निर्वाचित सदस्यांची बैठक बोलावून तारीख व वेळ निश्चित करण्यासह २३ जानेवारीपर्यंत विभागीय आयुक्तांकडे तसा प्रस्ताव सादर करावा. जानेवारीदरम्यान २४ ते २५ विभागीय आयुक्तांनी प्रथम सभेची तारीख जाहीर करावी. बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता २७ व २८ जानेवारीदरम्यान महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्यांनी नामनिर्देशन पत्र सादर करावे. त्यानंतर ३० व 31 तारखेस

महापौर व उपमहापौरपदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौरांची निवड करावी, अशा सूचना देण्यात जानेवारीदरम्यान आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या निवडणुका ३१ जानेवारीच्या आत निकालासह घेण्याचे निर्देश दिले होते. यापार्श्वभूमीव्र १५ जानेवारीला निवडणूक होऊन १६ जानेवारीला मतमोजणी झाली. त्यात सर्वाधिक ७२ जागा मिळाल्याने भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतापेक्षा दहा जागा अधिक मिळाल्याने भाजपचाच महापौर होणार हे स्पष्ट झाले आहे.