दिव्य प्रसाद उपचार धामचे संस्थापक वैभव रमेश जगझाप यांना ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026’ प्रदान

दिव्य प्रसाद उपचार धामचे संस्थापक वैभव रमेश जगझाप यांना ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026’ प्रदान
नाशिक : जनमत नाशिक येथील दिव्य प्रसाद उपचार धाम, अशोक नगर, सातपूरचे संस्थापक व सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट वैभव रमेश जगझाप यांना ॲक्युपंक्चर व नैसर्गिक आरोग्यसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला.
दि. 19 जुलै 2026 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील विविध रुग्णांना ॲक्युपंक्चरद्वारे उपचार सेवा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रसार करणे तसेच आरोग्य जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ॲक्युपंक्चरिस्ट व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेकलावंत सुयोग गोरे, ॲड. नाझेर काझी (प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ॲड. दत्तात्रय जाधवर आणि ॲड. नागेश सोनुने उपस्थित होते.

तसेच मंचावर चेअरमन डॉ. सतीश कराळे, डॉ. नितीनराजे पाटील (व्हाईस चेअरमन, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन), राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर, श्री. प्रशांत सावंत, सौ. दिशा चव्हाण, श्री. विजय नवल पाटील, श्री. तुषार वाघूळदे तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वैभव रमेश जगझाप यांना प्राप्त झालेल्या ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026’ निमित्त वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह रुग्ण, हितचिंतक आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



