सिंहस्थ कुंभमेळाच्या कामांना वेग. गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आढावा बैठक . महापौरांची उपस्थिती.

. नाशिक जनमत सिहंस्थ कुंभमेळाच्या कामांना वेग देण्यासाठी आज माननीय कुंभमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आढावा बैठकीस उपस्थित राहून जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या घाट, रस्ते तसेच विविध पायाभूत सुविधा विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला.

नाशिकमध्ये येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व कामे मार्च २०२७ पूर्वी गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण व्हावीत, तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढून कामांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीस कुंभमंत्री मा. गिरीशभाऊ महाजन, उपमहापौर श्री. विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते



