मुख्यमंत्री लाडकी बहीण अपात्र लाभार्थीनी लाटले सरकारचे २६ हजार कोटी.

मुंबई । प्रतिनिधी नाशिक जनमत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या ८१ लाख लाभार्थ्यांनी गेल्या २२ महिन्यात राज्य सरकारचे जवळपास २६ हजार ७३० कोटी रुपये लाटले आहेत. अपात्र महिलांकडून रक्कम वसूल न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. मात्र, सरकारी यंत्रणेची दिशाभूल करत योजनेचा लाभघेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून लाभ वसूल केला जाणार आहे. हा लाभ कसा वसूल करायचा? असा प्रश्न सरकारसमोर आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. २१ ते ६५ वर्ष वयाच्या आणि वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आल्या होत्या. या महिलांच्या बँक खात्यात १ जुलै २०२४ पासून महिना १५०० रुपयांचा लाभ जमा करण्यात आला. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महायुती सरकारने योजनेचा सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६५ लाख महिला
या योजनेतून बाद झाल्या.



