कांद्याचे भाव घसरले. शेतकरी वर्गावर मोठे संकट पाच रुपये किलो ने विकावा लागतो कांदा.

बळीराजाच्या डोळ्यात पाणी कादा ५०० रूपयावर घसरला – कांद्याने कधीकाळी गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणलें होतें, आज तोच कांदा बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण भागात सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम जोमाने सुरू आहे. मात्र रक्ताचें पाणी करून पिकवलेल्या या लाल सोन्याला बाजारात

चक्क कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील बाजार समितीच्या कांदा बाजारात आज शुक्रवारी कांद्याचे दर ५०० रूपयांपर्यंत घसरले. दोन दिवसातच दरात ४०० रूपयांनी घसरण झाली. आज शुक्रवारी ४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
नाशिक जनमत शेतकऱ्यांना एक एकर कांदा पिकवण्यासाठी साधारण ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो. यात बियाणे, खते, मजुरी, मशागतीचा समावेश आहे. मात्र, सध्या बाजारात कांद्याला केवळ ५०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. या दरात साधी
मजुरी, वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पदचे पैसे खर्च करून पिकवलेला कांदा विकायचा कसा? असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारत आहेत. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून कांद्याचे पीक हाती आले. त्यात मध्यंतरी गारपीठ व अवकाळी पावसामुळे कांदा काहीअंशी खराब झाला. त्यात कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या भागातून कांदा येत असल्याने मागणी कमी आवक जास्त अशी स्थिती झाली आहे. परिणामी आता कांद्याला कमी बाजारभावाचे संकट घेरत आहे.

गेल्या आठवडाभरापासून कांद्याचे भाव मात्र कोसळत आहेत. चाळीसगाव बाजार समितीचा कांदा बाजार चाळीसगाव परिसरात प्रसिद्ध आहे. येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आवक होते. दोन दिवसापूर्वी कांद्याला ९०० रूपयांपर्यंत भाव होता, आज शुक्रवारी तो ४०० रूपयांनी घसरून ५०० रूपये प्रति किंटलवर आला. त्यामुळे कांदा
उत्पादक शेतकरी रडकुंडीस आला आहे. चांगले भाव मिळतील. या आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नशिबाचा जुगार खेळत आहे. ज्या कांद्याच्या पिकाने घराची अर्थव्यवस्था सुधारेल असे वाटले होते, त्याच कांद्याने आज शेतकऱ्यांची ‘वांदा’ करून टाकला आहे. खर्च करून कांदा निघाला तर त्याला भाव नाही. नुकसान भरपाई तर मिळत नाहीच. कष्टाचे फळही मिळेनासे झाले आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
परराज्यातून
वाढलेली कांद्याची आवक आणि मागणी कमी यामुळे कांद्याचे दर कमालीचे घसल्याने शेतकरी अडचणीत आला असतांना बाजारातील अस्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर गरज नसेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही दिवस कांदा विक्री करण्याची घाई करू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आवक एकदम वाढल्याने कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. मनमाड लासलगाव उद्यादी मार्केटमध्ये देखील असेच भाव आहे.
शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.


