कृषीवार्ताक्रिडा व मनोरंजन

वृक्षांबाबत न्यायालयीन आदेश पाळा; महापौरांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

वृक्षांबाबत न्यायालयीन आदेश पाळा; महापौरांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

 

 

 

 

 

 

 

नाशिक जन्मत  नाशिक शहरात सध्या विकासाची कामे चालू असून अनेक ठिकाणी विकासाच्या आड येणाऱ्या वृक्षांवर कुराड चालवल्या जात आहे. त्या विरोधी वृक्ष प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान वृक्षप्रेमी व अनेक संस्थांनी वृक्ष तोडणे यासाठी कोर्टात अपील केलेले आहे कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आदेश नाशिकच्या महापौर हिम गौरी अडके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

 

‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’च्या वतीने वृक्षतोड विरोधी मोर्चानंतर दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी उद्यान अधीक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २२) आंदोलनातील प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी वृक्षांबाबत अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी तंबी देण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच राहील आणि आवश्यकतेनुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे यावेळी आनंद रॉय, तल्हा शेख, अदिती पटेल, निकिता जांगिड व समर रॉय यांनी सांगितले.

 

आदेशांचे पालन करण्याच्या सूचना

अधिकाऱ्यांकडून न्यायालयीन आदेशांचे आणि नियमांचे पालन केले जाईल. अधिकाऱ्यांना तशा सक्त सूचना दिल्या आहेत. असे महापौर हिंमगोरी आडके यांनी सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे