ब्रेकिंग

निफाड तालुक्यातील महेश गिरी धरणगाव खडक .भोंदू बाबाचे कारनामे समोर.

भोंदू अशोक खरातपाठोपाठ आता निफाड तालुक्यातही एका भोंदूबाबावर लैंगिक शोषण

 

 

 

 

नासिक जनमत    सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणाहून अंधश्रद्धेच्या फायदा घेऊन अनेक नागरिक महिलांना फसवणाऱ्या बाबांचे प्रकार समोर येऊ लागले आहे. नाशिक मधील भोंदू अशोक खरातपाठोपाठ आता निफाड तालुक्यातही एका भोंदूबाबावर लैंगिक शोषण

 

केल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१, रा. धारणगाव खडक) असे या भोंदूबाबाचे नाव असून, नैताळे-धारणगाव रोडवर प्रतिगाणगापूर नावाने स्थापन केलेल्या निर्गुण पादुका मठात चालणारे त्याचे कारनामे समोर आले आहे. लासलगाव पोलिस ठाण्यात २८ वर्षीय पीडित महिलेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

 

पीडित महिलेचे दोन विवाह अपयशी ठरल्याने आणि मुलगी

 

 

नसल्याने ती तिच्यासोबत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या परिस्थितीत तिच्या आई-वडिलांनी तिला धारणगाव (खडक) येथील तथाकथित प्रतिगाणगापूर मठात नेले. तेथे महेशगिरी काकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत महिलांवरील भुताटकी काढण्याचे काम करीत असल्याचा आभास निर्माण करीत होता. पीडित महिला १५ ऑगस्ट २०२४ रोजी आई-वडिलांसह मठात गेली असता, काकडे याने धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तसेच तिचे विवस्त्र फोटो काढून धमकी दिली.

 

 

 

 

मठात पापक्षालनाचे कुंड

 

दत्त संप्रदायातील शेकडो वर्षांचे धार्मिक स्थळ म्हणून ख्याती असलेल्या गाणगापूर (कर्नाटक) येथील मठातील निर्गुण पादुकांची प्रतिकृती केली आहे. मठाजवळ त्याने पापनाशक कुंड तयार केले असून, या कुंडात स्नान केल्यास सर्व पाप नाहीसे होतात, असे दावे तो करतो.

 

 

 

स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यास जागाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान या घटनेने निफाड तालुका हदरला ला असून  या बाबाचे नवीन प्रताप मोठ्या प्रमाणात समोर येण्याची चित्र आहे. काही दिवसात पुन्हा बाबावर नागरिक महिला समोर येऊन गुन्हे दाखल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लासलगाव पोलीस अधिक तपास करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे