कृषी हवामान सल्ला: महाराष्ट्र राज्य* *कालावधी:* 31 मार्च ते 3 एप्रिल 2026 *आधारित स्रोत:* IMD प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व नागपूर
🌦️ *कृषी हवामान सल्ला: महाराष्ट्र राज्य*
*कालावधी:* 31 मार्च ते 3 एप्रिल 2026
*आधारित स्रोत:* IMD प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व नागपूर
*हवामान सारांश*
राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना *⛈️, वीजांचा कडकडाट 🌩️, वादळी वारे 🌪️, गारपीट 🌨️ व हलका ते मध्यम पाऊस*🌧️होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये *गारपीटीचा धोका* अधिक आहे.
📅 *31 मार्च*
*(⚠️ अलर्ट: ऑरेंज अलर्ट🟠)*
⛈️🌨️गारपीट + मेघगर्जना + 🌩️ वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली
(⚠️ *अलर्ट: यलो अलर्ट 🟡)*
*⛈️मेघगर्जना + 🌩️वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता*
• नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
📅 *१ एप्रिल*
(⚠️ *अलर्ट: यलो अलर्ट 🟡)*
⛈️ *मेघगर्जना + 🌩️वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता*
• सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे.
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
📅 *2 एप्रिल*
(⚠️ *अलर्ट: यलो अलर्ट 🟡)*
*🌧️मेघगर्जनेसह पावसाची शक्यता*+ *जोरदार वारे*🌪️
• सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, नंदुरबार, परभणी, हिंगोली.
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
📅 *3 एप्रिल (⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)*
🌧️ *मेघगर्जनेसह पावसाची शक्यता + जोरदार वारे*
• जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
📢 *सामान्य सल्ला*
• मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे.
• शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे.
• वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत.
• शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात.
🌾 *रबी पिके (काढणी अवस्था)*
सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.
• काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे.
• पुढील २४ तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
• शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे.
• ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.
🍇 *द्राक्ष*
• ज्या बागांमध्ये द्राक्ष काढणीच्या अवस्थेत आहेत, त्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. अशा मण्यांमध्ये पुढे बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. पाऊस पडल्यानंतर दुपारच्या वेळेस चांगले ऊन पडून बागेत बऱ्यापैकी वारे वाहत असल्यास क्रॅकिंगचा धोका राहत नाही. काहीही करण्याची गरज नाही. क्रॅकिंगचा धोका जास्त वाटल्यास घडांवर कायटोसॅन ३ मि.ली. अधिक ट्रायकोडर्मा २.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारावे.
• बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्यास द्राक्ष वेलींची वाढ मंदावते. त्यामुळे बागेत पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा.
• द्राक्ष घडांचे गारापासून संरक्षणासाठी शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.
• पावसाचे पाणी बेदाणे शेड मध्ये आल्यास बेदाणे पावसाच्या पाण्याने भिजू शकतात व त्यामुळे त्यांची प्रत खराब होऊन नुकसान होऊ शकते. द्राक्षांपासून बेदाणे तयार करणाऱ्या शेड मध्ये पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून शेड झाकून घ्यावे. पावसाचे पाणी बेदाणे शेड मध्ये आल्यास त्वरित बाहेर काढावे जेणे करून शेडमधील आर्द्रता वाढणार नाही.
🥭 *आंबा*
• केऱ्या तसेच पक्व होत असलेल्या आंबा फळांना इजा होऊन फळे खराब होऊ शकतात त्यांची प्रत खालावू शकते. पावसापासून बचावासाठी पक्व झालेल्या आंबा फळांची त्वरित काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
• आंब्याच्या आकाराच्या फळांना फक्त माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळगळ झालेली असल्यास पहिली फळे गोळा करून नष्ट करावीत व दररोज फळ माशी सापळे @ २ प्रति एकर या प्रमाणात लावावेत. आकर्षणासाठी हायड्रोलायझेट प्रोटीनचा वापर करावा.
🍌*केळी*
• जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने केळी झाडे उन्मळून पडू नये म्हणून केळी झाडांना काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.
• गारांची शक्यता असल्याने शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.
🥬*भाजीपाला पिके*
• गारपीट आणि पावसाची व जोराच्या वाऱ्याची शक्यता असल्याने, वेलवर्गीय भाज्यांना आधार द्यावा जेणेकरून वारा आणि पावसामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. शक्य असल्यास उघड्यावर असलेली रोपवाटिका प्लास्टिक पेपरने झाकून घ्यावी. शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.
🐄 *पशुधन*
• वीजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरे झाडाखाली किंवा धातूच्या कुंपणाजवळ बांधू नयेत.
• जनावरे शक्यतो बाहेर चरावयास नेऊ नयेत.
*🌩️शेतात असताना जर मेघ गर्जना होत असेल तर काय करावे काय करू नये*
✅ *काय करावे*
➤ मेघगर्जना व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने फळबागांना व भाजी पाला पिकाला आधार द्यावा.
➤ जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परिसरातील सर्वात उंच वस्तू टाळून जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दड घालून बसावे (आपले पाय पोटाशी धरून बसावे).
➤ मेघ गर्जना होत असल्यास झाडाखाली उभे राहू नये.
➤ प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा विहिरीपासून दूर ठेवावे.
➤ प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूच्या शेतीच्या उपकरणापासून दूर ठेवावे
➤ शेतातील उभ्या पिकामधून अतिरिक्त पावसाचे पाणी काढून टाकावे.
➤ जर शेतातील पिक / उत्पादन शेतात राहिले असल्यास पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे.
❌ *हे करू नका*
➤ विद्युत उपकरण किंवा वायर/केबल यांचा संपर्क टाळा.
➤ कोणत्याही धातू ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुकाचीचा संपर्क दूर ठेवा जे धातू वा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत.
➤ आपल्या प्राण्यांना झाडाखाली जाऊ देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
📩 *संदेश*
दिनांक *31 मार्च* रोजी *ऑरेंज अलर्ट* असल्यामुळे गारपीट व वादळी पावसाचा धोका जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची सर्व कामे नियोजनपूर्वक करावीत व पिकांचे संरक्षण करावे.
*ना.दे.कृ.सं.प्र., मुंबई*
