आरोग्य व शिक्षण

नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ एप्रिल रोजी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन*

 

 

*उर्जा प्रतिष्ठान, नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ एप्रिल रोजी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन*

नाशिक जनमत   शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि उर्जा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत बाळासाहेब ठाकरे स्मृतीउद्यान, पंपिंग स्टेशन रोड, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे.

या मेळाव्यात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांचा सहभाग असून उमेदवारांना ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू देण्याची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांना तत्काळ नोकरीची संधी (इमिजिएट जॉइनिंग) उपलब्ध होणार आहे.

 

यासोबतच, ज्या युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी विविध शासकीय महामंडळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार असून विविध बँकांमार्फत कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे.

 

*सहभागी प्रमुख कंपन्या*

• महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक

• बॉश लिमिटेड, नाशिक

• जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड

• युवाशक्ती स्किल इंडिया प्रा.

• एस्टेमो इंडिया प्रा. लि

• एमएसएल ड्राइव्हलाइन सिस्टम्स लिमिटेड

• बजाज सन्स लिमिटेड

• आनंद आय-पॉवर

• ऐन्डुरंन्स टेक्नोलॉजीस

• टपरिया टूल्स लिमिटेड

• मदरसन ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग

• धुमल इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि

• किम्पलास पाइपिंग सिस्टीम्स लिमिटेड

• एमडी इंडस्ट्रीज

• मॉसडोर्फर इंडिया प्रा. लिमिटेड

• नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड)

• वैष्णवी ऑटो (पा.) लिमिटेड.

• फार्मा कंपनीज इन कोकंण टँड गोवा

• ब्लुस्टर्स लिमिटेड.

• टाटा कुमिन्स

• गॅबरिल इंडिया प्रा.लि.

• SMS पुणे

• महिंद्रा अँड महिंद्रा, पुणे

• रिंग प्लस अॅक्युवा, सिन्नर

• एम.आर.एफ., धेज गुजरात

• अमेझॉन, भिवंडी

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे